बचत करण्याची सुवर्णसंधी! नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी स्वस्त झाला Realme चा जुना फोन, असा घ्या ऑफर्सचा फायदा
टेक कंपनी Realme ची नवीन स्मार्टफोन सिरीज Realme 14 Pro नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाँच होणार आहे. 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या Realme 13 Pro सिरीजचा उत्तराधिकारी म्हणून कंपनी Realme 14 Pro लाँच करणार आहे. Realme 14 Pro चे काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. मात्र या नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी जुन्या स्मार्टफोनच्या किंमतीत घसरण झाली आहे.
Apple AirPods: गाणी ऐकण्यासोबतच आता हेल्थ अपडेटही मिळणार, Apple चं नवीन गॅझेट बरंच फायद्याचं ठरणार
नवीन फोन येण्याआधी जुन्या सीरिजच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. Realme 14 Pro बाजारात लाँच होण्याआधीच Realme 13 Pro आणि realme 13 Pro+ च्या किमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी आता तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Realme 13 Pro आणि realme 13 Pro+ चा विचार करू शकता. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या खरेदीवर तुम्ही चांगली बचत करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
Realme 13 Pro 5G स्मार्टफोनचा GB रॅम आणि 128 GB व्हेरिअंट 26,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर तुम्ही हा स्मार्टफोन 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर Realme 13 Pro 5G स्मार्टफोनचा 256 GB व्हेरिअंट 25,999 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. तर, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये होती, मात्र आता हा व्हेरिअंट 28,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटच्या खरेदीवर तुम्ही 3000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
Realme 13 Pro+ 5G बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटवर 2000 रुपयांचे डिस्काऊंट उपलब्ध आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंट आता 30,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिअंट 34,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
वर्षाच्या शेवटी Jio चा युजर्सना पुन्हा झटका; या दोन लोकप्रिय प्लॅन्सची व्हॅलिडीटी केली कमी
प्रोसेसर- स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 4nm प्रोसेसर आहे.
डिस्प्ले- फोन 6.7-इंच OLED, 2412×1080 पिक्सेल FHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 2000nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो.
कॅमेरा- फोनमध्ये 50MP Sony LYT-600 OIS कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड आणि 32MP सोनी सेल्फी कॅमेरा आहे.
बॅटरी- यात 5200mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग फीचर आहे.
प्रोसेसर- कंपनी Snapdragon 7s Gen 2 4nm प्रक्रियेसह Realme 13 Pro+ 5G ऑफर करते.
डिस्प्ले- फोन 6.7 इंच OLED, 2412×1080 pixels FHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 2000nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येतो.
कॅमेरा- फोनमध्ये 50MP Sony LYT-600 periscope कॅमेरा, 50MP Sony LYT-701 OIS कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 32MP सोनी सेल्फी कॅमेरा आहे.
बॅटरी- हा फोन 5200mAh बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्जिंग फीचरने सुसज्ज आहे.