कोण आहेत Ghost hacker? ज्यांच्या निशाण्यावर आहेत मृत लोकं; काय आहे प्रकरण?
सध्याच्या डिजिटल काळात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. आपण आपल्या अनेक कामांसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतो. अगदी टिव्ही पाहण्यापासून ऑनलाइन पेमेंटकरण्यापर्यंत आपली सर्व काम तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. एकीकडे तंत्रज्ञानात प्रगती होत आहे, आणि दुसरीकडे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत.
लोकांना फसावण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी सायबर गुन्हेगार नेहमी नवीन पद्धतींचा वापर करतात. सायबर गुन्हेगार युक्त्या अवलंबून सामान्य लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत तुम्ही अशा अनेक घटना ऐकल्या असतील ज्यामध्ये सायबर गुन्हेगार सामान्य माणसांची फसवणूक करत आहेत. मात्र आजकाल एक नवीन घोटाळा समोर आला आहे, जो जिवंत माणसांऐवजी मृत लोकांसोबत होत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही म्हणाल, काय विचित्र गोष्ट आहे, हे कसं होऊ शकतं? होय, हे ऐकायला विचित्र वाटू शकते. पण आजकाल ‘घोस्ट हॅकर्स’ची टोळी बाजारात धुमाकूळ घालत आहे. ही टोळी अत्यंत हुशारीने मृत लोकांना लक्ष्य करते. हा घोटाळा काय आहे आणि घोटाळे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा नक्की काय उद्देश आहे, याबद्दल जाणून घेऊया.
घोस्ट हॅकर्स मरण पावलेल्या लोकांच्या सोशल मीडिया अकाऊंटना लक्ष्य करत असल्याचं समोर आलं आहे. मृत व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरणे हा त्यांचा उद्देश आहे. जर घोस्ट हॅकर्स मृत व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरण्यात यशस्वी झाले तर ते त्यांचे सोशल मीडिया अकाउंट वापरून इतरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. सायबर गुन्हेगार मृत व्यक्तीच्या खात्यातून कोणालाही संदेश पाठवतात आणि पैशांची मागणी करतात.
उदाहरणार्थ, सायबर गुन्हेगार असा सापळा लावतात ज्यात कोणीतरी अडकतो. ते अशा लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात, ज्यांचा मृत व्यक्तीशी दूरदूरपर्यंतही संबंध नसतो. मृत व्यक्तिच्या अकाउंटमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर, स्कॅमर प्रथम सोशल मीडियाद्वारे लोकांशी ओळख करून घेतात आणि जेव्हा त्यांना वाटतं की आता समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली जाऊ शकते, तेव्हा ते त्यांचे खरे काम सुरू करतात. फसवणूक करणाऱ्यांना पकडणेही सोपे नाही. कारण एकदा घोटाळा झाला की ते गायब होतात.
अशा प्रकारचे घोटाळे टाळण्याचा मार्ग म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये प्रवेश मिळवणे. फेसबुक व्यक्तीच्या मृत्यूनंतर अकाउंट नॉमिनी म्हणून मृत व्यक्तिचे अकाऊंट वापरण्याची परवानगी देते. सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला ‘मेमोरियलायझेशन’मध्ये दोन पर्याय मिळतात. पहिली म्हणजे ‘मेमोरियलाईज’ म्हणजेच यामध्ये एखाद्या व्यक्तीची नॉमिनी म्हणून निवड केली जाऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे मृत व्यक्तीचे अकाउंट डिलीट करणे.
या कारणांमुळे होतो Smartphone Blast! अशा प्रकारे घ्या तुमच्या फोनची योग्य काळजी
तुम्ही यापैकी एक पर्याय निवडून पुढे गेल्यास, तुम्हाला लीगेसी संपर्क निवडण्याचा पर्याय मिळेल. ज्यामध्ये कुटुंबातील कोणताही सदस्य, मित्र किंवा प्रिय व्यक्ती निवडता येईल. फेसबुकप्रमाणेच इंस्टाग्रामवरही ‘मेमोरिलायझेशन’ फीचर देण्यात आले आहे. ज्यामुळे कुटुंबातील कोणताही सदस्य, मित्र किंवा प्रिय व्यक्ती मृत व्यक्तीचे अकाउंट वापरू शकतो. यामुळे. सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी मदत होणार आहे.