Year Ender 2024: भारतात यावर्षी 'या' फोल्डेबल फोन्सनी गाजवलं मार्केट, Google पासून Samsung पर्यंत वाचा कोणाचा समावेश
लवकरच 2024 हे वर्ष संपणार आहे. भारतात फोल्डेबल स्मार्टफोनसाठी 2024 हे वर्ष खूप खास ठरलं. 2024 मध्ये अनेक प्रकारचे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले. यातील काही स्मार्टफोन्स बेस्ट ठरले तर काहींच्या बाबतीत युजर्सनी प्रचंड तक्रार केली. या वर्षाच्या शेवटी आता आपण 2024 मध्ये कोणते फोल्डेबल स्मार्टफोन्स बेस्ट ठरले, याबद्दल जाणून घेऊया.
या वर्षी, Google चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Google Pixel 9 Pro Fold भारतात लाँच करण्यात आला आहे. यासोबतच सॅमसंगचा नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Fold5 5G देखील बाजारात आला आहे. चला, या वर्षी इतर कोणत्या कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच केले आहेत ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google Pixel 9 Pro Fold हा भारतात लाँच होणारा Google चा पहिला फोल्डेबल फोन आहे. Google Pixel 9 Pro Fold भारतात 1,72,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला. हा फोन अनेक नवीन फीचर्ससह भारतीय बाजारात दाखल झाला. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Google Tensor G4 चिपने सुसज्ज आहे. तसेच, या फोनमध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 10.5MP सेकेंडरी आणि 10.8MP तिसरा कॅमेरा आहे. याशिवाय व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo X Fold 3 Pro मध्ये 8.03 इंचाचा डिस्प्ले देण्याच आला आहे. या फोल्डेबल फोनमध्ये 6.53 चा सेकेंडरी कॅमेरा आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 64MP टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Vivo X Fold 3 Pro फोनची किंमत 1,59,999 रुपये आहे.
Samsung Galaxy Z Fold5 5G स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 7.6 इंचाचा मुख्य डिस्प्ले आहे. तसेच, फोनमध्ये 6.2 इंच कव्हर डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP तिसरा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 4400mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे. या फोनची किंमत 1,54,999 रुपये आहे.
Realme Neo 7: मोठी बॅटरी असलेला Realme चा नवीन फोन लाँच, बजेट सेगमेंटमध्ये मिळणार बेस्ट फीचर्स
TECNO PHANTOM V Fold 2 मध्ये 6.42 इंच कव्हर डिस्प्ले आहे. हा फोन MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि दोन 32MP फ्रंट कॅमेरे आहेत. यात 5750mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 79,999 रुपये आहे.