Free मध्ये पाहा Paatal Lok 2! रिलायंस जियोचं 49 करोड युजर्ससाठी खास गिफ्ट, आत्ताच घ्या सुवर्णसंधीचा फायदा
तुम्ही देखील जिओ युजर्स आहात आणि तुम्हाला पाताल लोक 2 पाहण्याची इच्छा आहे? तर तुमच्यासाठी एक आनांदाची बातमी आहे. जिओने आपल्या लाखो ग्राहकांना खुश करण्यासाठी आणखी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये जिओ युजर्सना फ्रीमध्ये पाताल लोक 2 पाहण्याची संधी मिळणार आहे.
जिओने आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी रिलीज झालेली “पाताल लोक 2” ही वेब सिरीज मोफत पाहण्याची संधी दिली आहे. जिओच्या विशेष रिचार्ज प्लॅनसह, तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही वेब सीरिज पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला देखील पाताल लोक 2 ही वेब सिरीज पाहायची असेल, तर आत्ताच जिओच्या या ऑफरचा लाभ घ्या. मोफत वेब सीरिज पाहण्याव्यतिरिक्त, जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दीर्घ व्हॅलिडीटी, अनलिमीटेड विनामूल्य कॉलिंग आणि भरपूर डेटा देखील मिळतो. तुम्हाला एकाच रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे मिळू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
जिओच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. ज्यामध्ये नेटफ्लिक्स, Amazon Prime Video, जिओ सिनेमा अशा अनेक ओटीटी ॲप्सचा समावेश आहे. पाताल लोक 2 आज Amazon Prime Video वर रिलीज झाला आहे. ही वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पण जर तुम्हाला Amazon Prime Video चे वेगळे सबस्क्रिप्शन खरेदी करायेच नसेल, तर तुम्ही जिओचा स्पेशल रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा यासह Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही पाताल लोक 2 मोफत पाहू शकता.
जिओने 1029 रुपयांचा चांगला प्लॅन सुरु केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलीडिटी मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल करू शकता. याशिवाय तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएसही मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 168GB हाय-स्पीड डेटा मिळेल. तुम्ही दररोज 2GB हाय-स्पीड डेटा वापरू शकता. या प्लॅनमध्ये Amazon Prime Lite चे 84 दिवसांचे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे तुम्ही “पाताल लोक 2” विनामूल्य पाहू शकता. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला एकाच प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि OTT सबस्क्रिप्शन दोन्ही मिळत आहे. ज्यामुळे तुमचा फायदा होणार आहे.
पाताल लोकच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या सिरीजचा नवा सीझन रिलीज झाला आहे. ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर स्ट्रीम केली जात आहे. या सीझनमध्ये 8 एपिसोड आहेत. पाताल लोक 2 चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांना या सिरीजबद्दल उत्सुकता होती आणि आता ही सिरीज रिलीज होताच चाहते त्याला भरभरून प्रेम देत आहेत.
Upcoming Devices: 2025 मध्ये Apple चे हे बहुप्रतिक्षित डिव्हाईस होणार लाँच, iPhone 17 चा बोलबाला
पाताल लोक 2 ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजमध्ये जयदीप अहलावत, गुल पनाग, इश्वाक सिंग, तिलोत्तमा शोम यांसारखे स्टार्स दिसणार आहेत. प्राइम व्हिडिओजने पाताल लोक 2 चे सर्व भाग एकाच वेळी रिलीज केले आहेत. या क्राईम थ्रिलर मालिकेत चाहत्यांना सस्पेन्स, थ्रिल, ॲक्शन, ड्रामा आणि ट्विस्टची रोलर कोस्टर राईड पाहायला मिळणार आहे.