एक-एक नाही आता बल्कमध्ये डाऊनलोड करा Google Photos आणि Videos, ही आहे सोपी प्रोसेस
आपण सर्वचजण स्मार्टफोन वापरतो. आपण स्मार्टफोनमध्ये प्रत्येक क्षणाचे फोटो क्लिक करत असतो. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटोजमध्ये सेव्ह केले जातात. आपल्याला गरज असेल तेव्हा आपण गुगल फोटोजमध्ये सेव्ह असलेले फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड करतो. परंतु बऱ्याचदा अनेकांना अशा समस्येचा सामना करावा लागतो की जेव्हा जेव्हा एखाद्याला फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड करायचा तेव्हा ते डाउनलोड करण्यात बराच वेळ वाया जातो.
शिवाय युजर्सची एक मोठी समस्या म्हणजे ते एकाच वेळी अनेक फोटो डाउनलोड करू शकत नाहीत. पण तुम्ही काही सोप्या प्रोसेसचा वापर केला आणि काही स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही अगदी सहज गुगल फोटोजमधील फोटो आणि व्हिडीओ बल्कमध्ये डाऊनलोड करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल फोटोजमध्ये अमर्यादित स्टोरेज सेवा बंद करणयात आल्याने युजर्स 15 GB पेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करू शकत नाही. अमर्यादीत स्टोरेज सेवा सुरु ठेवण्यासाठी युजर्सना काही रक्कम भरावी लागत आहे. मात्र, यामध्ये तुमचे जुने फोटो मोजले जाऊ नयेत. अशा परिस्थितीत फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी तुम्ही गुगल फोटो व्यतिरिक्त कोणते पर्याय वापरू शकता, याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वापरकर्त्यांकडे Amazon Photos, iCloud Drive, Dropbox, Flickr आणि OneDrive सारखे क्लाउड स्टोरेज पर्याय आहेत जेथे फोटो आणि व्हिडिओ स्टोअर केले जाऊ शकतात. या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचे गुगल फोटोज एक्सपोर्ट करावे लागतील.
Oppo Reno13 5G सिरीजची लाँच डेट कन्फर्म, या दिवशी भारतात करणार एंट्री! जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स