Oppo Reno13 5G सिरीजची लाँच डेट कन्फर्म, या दिवशी भारतात करणार एंट्री! जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
तुम्ही देखील स्मार्टफोन कंपनी Oppo च्या नवीन सिरीजची प्रतिक्षा करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे, कारण येत्या काहीच दिवसांत स्मार्टफोन कंपनी Oppo ची नवीनतम सिरीज लाँच केली जाणार आहे. भारतासह निवडक जागतिक बाजारपेठेत लवकरच Oppo Reno 13 5G सिरीज लाँच होणार आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत Oppo Reno 13 5G सिरीजची लाँच डेट शेअर केली आहे.
तुमचं Instagram Account सस्पेंड झालंय? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने होईल रिकव्हर
Oppo Reno 13 5G सिरीजची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 9 जानेवारी रोजी भारतासह निवडक जागतिक बाजारपेठेत Oppo Reno 13 5G सिरीज लाँच केली जाणार आहे. कंपनीच्या नवीन आणि लेटेस्ट Oppo Reno 13 5G सिरीजमध्ये Oppo Reno 13 आणि Reno 13 Pro या दोन स्मार्टफोन्सचा समावेश असणार आहे. ही नवीनतम सिरीज लाँच होण्यापूर्वी अनेक डिटेल्स समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
फोनचे अनेक फीचर्स जसे की रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन यांची देखील पुष्टी करण्यात आली आहे. Oppo Reno 13 5G सिरीज चीनमध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आली होती. चीनमधील लाँचिंगनंतर आता कंपनी ही सिरीज भारतासह निवडक जागतिक बाजारपेठेत देखील लाँच करणार आहे. चला तर मग या नवीन आणि लेटेस्ट Oppo Reno 13 5G सिरीजच्या फीचर्स आणि किंमतीवर एक नजर टाकूया.
Oppo ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत Oppo Reno 13 5G सिरीजची लाँच डेट सांगितली आहे. कंपनीने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, Oppo Reno 13 5G सिरीज भारतात 9 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता लाँच होणार आहे. कंपनीने याची देखील पुष्टी केली आहे की ओप्पो इंडिया ई-स्टोअर व्यतिरिक्त, या लाइनअपचे फोन फ्लिपकार्टद्वारे देखील खरेदीसाठी उपलब्ध असतील.
Every moment has a story. Live in the moment as we unveil the launch of #OPPOReno13Series on 9th January 2025.#OPPOAIPhone #LiveInTheMoment
Know more: https://t.co/CQ6etIk4u5 pic.twitter.com/jfceSpDpky
— OPPO India (@OPPOIndia) January 3, 2025
स्टोरेज पर्याय – Oppo Reno 13 5G सिरीज 8GB रॅम तसेच 128GB आणि 256GB स्टोरेज पर्यायांसह ऑफर केले जाईल. ही नवीनतम सिरीज भाारतात आयव्हरी व्हाइट आणि ल्युमिनस ब्लू शेडमध्ये लाँच केली जाणार आहे. Oppo Reno 13 Pro 5G मध्ये 12GB RAM सह 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट आहे. हा स्मार्टफोन ग्रेफाइट ग्रे आणि मिस्ट लॅव्हेंडर कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.
प्रोसेसर – Oppo Reno 13 5G सिरीज MediaTek Dimensity 8350 तसेच Oppo च्या SignalBoost X1 चिप्सद्वारे समर्थित असू शकतात. हँडसेट AI-समर्थित इमेजिंग वैशिष्ट्यांसह सुसज्ज असतील आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 आणि IP69 रेटिंग देखील असतील.
Tech Tips: WhatsApp वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल मॅसेजमुळे वैतागलात? आत्ताच करा ही सेटिंग
कॅमेरा – Oppo Reno 13 Pro 5G मध्ये 3.5x ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमसह 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो शूटरचा समावेश असेल. याच्या मदतीने अंडरवॉटर फोटोग्राफीही करता येते.
बॅटरी – Oppo Reno 13 Pro 5G मध्ये 80W वायर्ड SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,800mAh बॅटरी असेल. दुसरीकडे, बेस Oppo Reno 13 5G मध्ये समान चार्जिंग क्षमतेसह थोडी लहान 5,600mAh बॅटरी असेल.