Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म... 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच
नीट यूजी 2026 ची पुर्नपरीक्षापूर्वी भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. 16 जून रोजी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69अ अंतर्गत एक अंतरिम आदेश जारी करून, 22 जूनपर्यंत टेलिग्राम आणि त्याच्याशी संबंधित लिंक्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. 22 जूनपर्यंत सरकारने टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय अॅप गुगल प्ले स्टोअरवरून देखील हटविण्यात आला होता. मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे. टेलिग्राम भारतात पुन्हा एकदा सुरु झाले आहे. टेलिग्राम प्ले स्टोअरवर देखील पुन्हा एकदा उपलब्ध झाले आहे. मात्र टेलिग्राममधील एडीट फीचर 30 जूनपर्यंत उपलब्ध होणार नाही. भारतीय यूजर्स 30 जून 2026 पर्यंत पाठवलेले मेसेज एडिट करू शकत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारने टेलिग्रामवरील बंदी हटवली असून भारतात अॅप पुन्हा एकदा सुरु झाले आहे. मात्र तरी देखील अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे की, ते टेलिग्राम अॅक्सेस करू शकत नाहीत. बंदी उठवल्यानंतर देखील काही यूजर्सना अॅपचा वापर करण्यात समस्या येत आहेत.
Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामच्या मेसेज एडिटींग फीचरचा वापर पेपरफुटीसंबंधित खोट्या अफवा पसरवण्यासाठी केला जात होता. यामध्ये गुन्हेगार परीक्षेपूर्वी कोणताही मेसेज पाठवत होते आणि परीक्षा संपल्यानंतर तोच मेसेज एडीट करून त्यामध्ये खरे प्रश्न पाठवत होते. टेलीग्राम एडिट फीचरची विशेषत: म्हणजेच यामध्ये मेसेज एडीट केल्यानंतर देखील जुनी वेळेच दाखवली जाते. यामुळे अनेकदा असं वाटतं की प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाली होती. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. याच सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने टेलिग्राममधील मेसेज एडिटींग फीचर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.






