पोको कंपनीने (Poco) आज दि. 17 डिसेंबर ला भारतात एक नवीन 5G एंट्री सेगमेंट फोन Poco C75 आणि मिड सेगमेंट फोन, Poco M7 Pro लॉंच केला आहे. पोकोने लॉंच केलेला Poco C75 5G हा स्मार्टफोम सर्वात 5 जी स्वस्त स्मार्टफोन आहे. या 5 जी स्मार्टफोनची किंमत ही 7,999 रुपये आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना अगदी 8 हजार रुपयांमध्ये 5 जी स्मार्टफोन आता विकत घेता येणार आहे.
Poco C75 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
Poco C75 5G मध्ये 6.88 इंचाची डिस्प्ले स्क्रीन आहे, या स्मार्टफोनची सर्वात जास्त ब्राइटनेस ही 600 nits इतकी आहे. पोकोने C75 5G मध्ये 5,160 mAh ची बॅटरी वापरली आहे आणि 18 W चा चार्जर दिला आहे. Poco C75 5G मोबाईल हा स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 चिपसेट वर 4 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित HyperOS 1.0 वर चालतो. कंपनीने 2 वर्ष OS आणि 4 वर्ष अपडेट्स देणार असल्याचा सांगितले आहे
कॅमरा- Poco C75 5G मध्ये 50 MP मुख्य लेन्स आणि QVGA सेकेंडरी कॅमेरा आहे. समोर, यात 5 एमपी लेन्स आहे.
किंमत- Poco C75 5G ची किंमत ₹7,999 आहे.
या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर 19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना हा मोबाईल ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.
पोकोने हा स्मार्टफोनन बाजारात आणल्याने बाजारातील अन्य स्पर्धक कंपन्यांनाही किंमतीबाबत नक्कीच विचार करावा लागणार आहे. येत्या काळात इतर मातब्बर कंपन्यांकडूनही कमी किंमतीमध्ये 5 जी स्मार्टफोन बाजारात आणला जाऊ शकतो. याचा फायदा हा भारतीय ग्राहकांना होणार आहे.
Poco M7 Pro स्मार्टफोन
पोकोने M7 Pro 5G हा फोनही लॉंच केला आहे. या स्मार्टफोन मध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आणि 2,100 nits ची शिखर ब्राइटनेस आहे. हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आहे. Poco M7 Pro ला 5,110 mAh बॅटरीमधून पॉवर मिळते. यासोबतच 45 W चार्जर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7025 अल्ट्रा चिपसेट 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB स्टोरेजसह देण्यात आले आहेत. हे C75 सारख्या OS वर देखील कार्य करते आणि त्याच OS आणि सुरक्षा अपडेट दिले जाणार आहे.
कॅमेरा- Poco M7 Pro 5G मध्ये 50 MP मुख्य Sony LYT-600 सेन्सरसह 2 MP मॅक्रो लेन्ससह येतो. यात 20 MP फ्रंट कॅमेरा आहे.
किंमत- Poco M7 Pro 6 GB/128 GB व्हेरियंटची किंमत ही 13,999 रुपये आहे. तर 8 GB/256 GB मॉडेल 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येऊ शकतो.
ऑनलाईन विक्री- या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर 20 डिसेंबरपासून त्याची विक्री सुरू होणार आहे.






