फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क
स्मार्टफोन खरेदी करताना त्याच्या कॅमेरा आणि प्रोसेसरसोबतच चार्जिंग स्पीडचा देखील विचार केला जातो. काही टेक कंपन्या असे स्मार्टफोन्स देखील लाँच करत आहेत, जे अगदी काही मिनिटांत 100 टक्के चार्ज होतात. ज्यामुळे दिर्घकाळ फोन चार्जिंगला लावून ठेवावा लागत नाही. स्मार्टफोनची चार्जिंग स्पीड युजर्सवर सर्वात जास्त परिणाम करते. कारण फोन जितका लवकर चार्ज होतो, तोच युजर्ससाठी फायद्याचा ठरतो. आता आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या चार्जिंग स्पीडसाठी ओखळलं जातात.
iQOO 13 5G मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ज्यामुळे हा स्मार्टफोन काही मिनिटांतच फुल चार्ज होतो. फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 6.82 इंच 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 32MP फ्रंट कॅमेरा आणि 16GB रॅमसह 512GB स्टोरेजने सुसज्ज आहे.
Realme GT Neo 5 देखील 240W चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन केवळ 10 मिनिटांत 100 टक्के चार्ज होतो, असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट आणि 4600mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 6.74-इंच 144Hz डिस्प्ले, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Realme GT 5 हा जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोनपैकी एक आहे. या डिव्हाईसमध्ये 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 100 टक्के चार्ज होतो. हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 6.74 इंच 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 24GB रॅम आणि 1TB स्टोरेजवाला व्हेरिअंट कमाल परफॉर्मंस ऑफर करतो.
Redmi Note 12 Explorer हा स्मार्टफोन 210W फास्ट चार्जिंगसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 4300mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी केवळ 9 मिनटांत फुल बॅटरी चार्ज करते. फोनमध्ये 6.67 इंच OLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर आणि 200MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.
Motorola Edge 50 Pro हा फोन 125W TurboPower चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर, 1.5K pOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे. या फोनमध्ये रंग अचूकतेसाठी पॅन्टोन व्हॅलिडेशन देखील आहे, ज्यामुळे तो कॅमेरा आणि डिझाइन उत्साही लोकांसाठी असणे आवश्यक आहे.
iQOO 10 Pro मध्ये 4700mAh बॅटरी आणि Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 200W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.






