नासा आज पुन्हा एकदा नव्या मोहिमेच्या तयारीत आहे. आज (शनिवारी) नासाकडून नवीन चंद्रयान लाँच करण्यात येणार आहे. ‘आर्टेमिस आय’ असं नासाच्या या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे. फ्लोरिडातील कॅनिडी स्पेस सेंटर येथून आज दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी Artemis I हे रॉकेट लाँच करण्यात येणार आहे.
मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही चाचणी करण्यात येत आहे. या चंद्रयानामधून एकही वैज्ञानिक चंद्रावर जाणार नाही. तर या रॉकेटमध्ये ओरियन कॅप्सूल असणार आहे. ओरियनमध्ये मानवांच्या जागी पुतळे ठेवले जाणार आहेत. यावेळी नासा स्पेससूट आणि रेडिएशन लेवलेचे मूल्यांकन करणार आहे. पुतळ्यांसोबत एक स्नूपी सॉफ्ट टॉय देखील पाठवला जात आहे, जे शून्य गुरुत्वाकर्षण निर्देशक म्हणून काम करेल. ओरियन चंद्राभोवती ४२ दिवसांचा प्रवास करेल.