Free Fire Max: गेममध्ये Wall Royale ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना फ्री मिळणार कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन
फ्री फायर मॅक्समध्ये आता प्लेअर्ससाठी Wall Royale ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेगवेगळ्या ग्लू वॉल स्किन मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ग्लू वॉल स्किनमध्ये कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किनपासून विंटरलॅंड्स ट्वेंटी-ट्वेंटी ग्लू वॉल स्किनपर्यंत अनेक स्किन्सचा समावेश आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये प्लेअर्सना त्यांचं नशिब अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तुमचे नशीब आजमावण्यासाठी, तुम्हाला इन-गेम चलन डायमंड्स वापरून स्पिन करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या नशिबाच्या आधारावर रिवॉर्ड यादीतून वस्तू मिळतील. (फोटो सौजन्य – YouTube)
वॉल रॉयल ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. 5 वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 40 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.






