Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर
भारतात स्टारलिंकच्या सर्विससाठी ग्राहकांना प्रति महिना 8,600 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच हार्डवेयर किटसाठी ग्राहकांना 34,000 रुपये द्यावे लागणार आहेत. स्टारलिंकचं असं म्हणणं आहे की, कंपनी नवीन कनेक्शनवर ग्राहकांना एका महिन्याचे ट्रायल फ्री देणार आहे. जर ग्राहकांना कंपनीची सर्विस आवडली नाही तर कंपनी त्यांना पूर्ण रिफंड देणार आहे. कंपनीने अद्याप भारतात बिजनेस प्लॅनची घोषणा केली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्टारलिंकच्या रेजिडेंशियल प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर भारतात स्टारलिंकची किंमत 8600 रुपये प्रति महिना असणार आहे. अमेरिकेत रेजिडेंशियल लाइट प्लॅनची किंमत $80 प्रति महिना म्हणजेच सुमारे 7,200 रुपये आणि स्टँडर्ड प्लॅनची किंमत $120 प्रति महिना म्हणजेच सुमारे 10,800 रुपये आहे. दूबईमध्ये स्टारलिंकच्या रेजिडेंशियल प्लॅनची किंमत AED 300 प्रति महिना म्हणजेच सुमारे 7,300 रुपये आहे. दुबईमध्ये हार्डवेअर किटची किंमत AED 1,500 म्हणजेच सुमारे 36,800 रुपये आहे. स्टारलिंक भूटानमध्ये BTN 4,200 प्रति महिना म्हणजेच सुमारे 4,210 रुपयांत सर्विस ऑफर करतो. हार्डवेयरची किंमत BTN 33,000 म्हणजेच सुमारे 33,100 रुपये आहे. बांग्लादेशात रेजिडेंशियल लाईट प्लॅनची किंमत BDT 4,200 प्रति महिना म्हणजेच सुमारे 3,100 रुपये आहे. तेसच स्टँडर्ड प्लॅनची किंमत BDT 6,000 म्हणजेच सुमारे 4,400 रुपये आहे. बांग्लादेशात हार्डवेयर किटची किंंमत BDT 39,600 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये आहेय
स्टारलिंकचं असं म्हणणं आहे की, त्यांची सिस्टिम कठीण परिस्थितीत देखील इंटरनेट कनेक्टिविटी प्रदान करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. म्हणजेच वादळ, वारा, पाऊस, या सर्व परिस्थितीत तुम्ही स्कारलिंक इंटरनेट सर्विसचा वापर करू शकतात. ही सर्विस कधीच बंद पडत नाही, असा दावा देखील केला जात आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, स्टाकलिंक ऊन, पाऊस किंवा वादळ कोणत्याही परिस्थितीत हाय स्पीड इंटरनेट ऑफर करण्यासाठी सक्षम आहे. स्टारलिंक अशआ ठिकाणी देखील इंटरनेट कनेक्टिव्हिटी ऑफर करते, जिथे मोबाईल सिग्नल उपलब्ध नाही.
स्टारलिंकला भारतात त्यांची सेवा सुरु करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. कंपनीने भारतात डेमो देखील सादर केला होता आणि आता कंपनी भारतात ट्रायल सुरु करत आहेत. त्यामुळे आता लवकरच भारतात स्टारलिंकची सेवा सुरु होण्याची अपेक्षा आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: नक्कीच! विशेषतः ऑनलाइन क्लासेस, वर्क फ्रॉम होम आणि स्ट्रीमिंगसाठी उपयुक्त.
Ans: हो, अत्यंत खराब वातावरणात स्पीड थोडा कमी होऊ शकतो, पण सेवा बंद पडत नाही.
Ans: होय, विशेषतः ग्रामीण भागात जिथे फाइबर इंटरनेट उपलब्ध नाही, तिथे Starlink मोठी क्रांती घडवू शकते.






