येत्या रविवारी लाँच होणार Xiaomi चा प्रिमियम स्मार्टफोन, 200MP कॅमेरा आणि मिळणार हे खास फीचर्स
चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सिरीज 2 मार्च रोजी लाँच केली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. Xiaomi त्यांची बहुप्रतिक्षित प्रीमियम फोन Xiaomi 15 सिरीज येत्या रविवारी म्हणजेच 2 मार्च रोजी लाँच करणार आहे. या सिरीजअंतर्गत दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत, ज्यामध्ये Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra यांचा समावेश असू शकतो. हे स्मार्टफोन भारतात 2 मार्च रोजी एंट्री करणार आहेत.
बहुप्रतिक्षित प्रीमियम फोन Xiaomi 15 सिरीज चीनमध्ये 27 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे, आणि त्यानंतर ही सिरीज भारतात लाँच केली जाणार आहे. यानंतर कंपनीची ही स्मार्टफोन सिरीज मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 दरम्यान जागतिक स्तरावर लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
Xiaomi ने त्यांच्या अधिकृत चीनी वेबसाइटवर या फोनचा रेंडर जारी केला आहे जो त्याच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांची झलक देतो. Xiaomi च्या आगामी स्मार्टफोन सिरीजसोबत Xiaomi SU7 Ultra EV कार, Xiaomi Buds 5 Pro आणि Redmi Book Pro 2025 सारखी इतर डिव्हाईस देखील लाँच करण्याची तयारी करत आहे. Xiaomi 15 Ultra ची रचना खूपच आकर्षक असेल, असं कंपनीने Weibo आणि तिच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन त्याच्या डिझाईनमुळे तरूणांना आकर्षित करणार आहे.
अहवालानुसार, हा स्मार्टफोन ड्युअल-टोन फिनिशसह लाँच केला जाऊ शकतो, ज्यामध्ये काच आणि व्हेगन लेदरचे मिश्रण असेल जे Leica कॅमेऱ्यांच्या क्लासिक डिझाइनपासून प्रेरित आहे. फोनच्या मागील पॅनलवर एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यामध्ये चार कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅश आहे. शाओमीने त्यांच्या मागील अल्ट्रा मालिकेतील डिझाइन ओळख कायम ठेवली आहे आणि यावेळी त्यात बॅक पॅनलच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात इटालिक अल्ट्रा ब्रँडिंग देखील आहे.
Xiaomi 15 Ultra मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite प्रोसेसर असेल जो अलीकडेच Geekbench AI डेटाबेसवर दिसला होता. या फोनमध्ये 16 जीबी रॅम असेल आणि तो अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, असे मानले जाते की यात 50MP चा 1-इंचाचा Sony LYT-900 प्रायमरी सेन्सर, 50MP Samsung ISOCELL JN5 अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP Sony IMX858 टेलिफोटो लेन्स असेल. यात 200 मेगापिक्सेल सॅमसंग ISOCELL HP9 सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. हा फोन IP68 आणि IP69 रेटिंगसह येईल, म्हणजेच हे डिव्हाइस धूळ आणि पाणी प्रतिरोधक असणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, Xiaomi आंतरराष्ट्रीय बाजारात 16GB RAM+512GB स्टोरेज पर्यायासह Xiaomi 15 Ultra लाँच करू शकते. हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि सिल्वर या रंगात लाँच केला जाऊ शकतो. Xiaomi 15 Ultra ची सुरुवातीची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 77,700 रुपये किंवा $896 असू शकते. कंपनीने Xiaomi 14 Ultra (16GB+512GB) भारतात 99,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे. चीनमधील Mi मॉलवर Xiaomi 15 Ultra ची प्री-ऑर्डर बुकिंग आधीच सुरू झाली आहे.