Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स
2025 या वर्षात वियरेबल टेक्नोलॉजीवर जास्त फोकस करण्यात आला होता. या वर्षात कंपनीने स्मार्टवॉचसोबतच स्मार्टरिंग देखील लाँच केल्या. स्मार्टरिंग एक असं गॅझेट आहे, ज्याचा लूक स्टायलिश आणि यामध्ये अनेक हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यांना स्लीप आणि अॅक्टिविटी ट्रॅक करायच्या आहेत, त्यांच्यासाठी हे गॅझेट जबरदस्त ठरणार आहे. हार्ट रेट, SpO2, स्लीप मॉनिटरिंगपासून बॉडी टेम्परेचरपर्यंत एका छोट्या रिंगमध्ये सर्वकाही समाविष्ट असतं. 2025 मध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या स्मार्ट रिंग लाँच केल्या आहेत. यातील काही टॉप रिंग्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जर तुम्हाला प्रिमियम डिझाईन आणि अॅडव्हान्स हेल्थ ट्रॅकिंग पाहिजे असेल तर तुम्ही डिझेल अल्ट्राह्युमन रिंग एअरची निवड करू शकता. या रिंगचा बाहेरील भाग स्पेस-ग्रेड टाइटेनियमने तयार करण्यात आला आहे, तर आतमध्ये हाइपोएलर्जेनिक रेजिनचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 6-अॅक्सिस मोशन सेंसर, हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजनसाठी PPG सेंसर, आणि मेडिकल-ग्रेड टेम्परेचर सेंसर देण्यात आला आहे. ही रिंग 100 मीटर पर्यंत वॉटर रेसिस्टेंट आहे आणि एकदा चार्ज केल्यावर 6 दिवस चालते.
भारतीय ब्रांड Noise ने लाँच केलेली Luna Ring 2.0 स्टाईल आणि हेल्थ फीचर्स दोन्हीसाठी परफेक्ट आहे. टाइटेनियम बॉडी, 5ATM वॉटर रेसिस्टेंस आणि iOS सपोर्ट सारख्या प्रीमियम फिचर्सने सुसज्ज आहे. यामध्ये हार्ट रेट, SpO2, स्किन टेम्परेचर आणि PPG सेंसर आहेत. अनेक रंगांच्या पर्यांयामुळे ही रिंग आकर्षक पर्याय आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही बजेट किंमतीत स्मार्टरिंग खरेदी करण्याचा विचार करत असाल बोट स्मार्टरिंग अॅक्टिव्ह प्लस एक चांगला पर्याय आहे. यामध्ये हलकी स्टील डिझाईन देण्यात आली आहे आणि 5ATM रेटिंगमुळे डिव्हाईस पाणी आणि घामापासून सुरक्षित राहते. याची सर्वात खास गोष्ट म्हणजेच यामध्ये मॅग्नेटिक चार्जिंग केस आहे, ज्यामुळे रिंग सुमारे 30 दिवसांपर्यंत चार्ज राहू शकते. स्मार्ट रिंग हार्ट रेट, SpO2 आणि स्लीप मॉनिटरिंगवर फोकस करते.
पेबल हॅलो स्मार्टरिंग अशा यूजर्ससाठी आहे, ज्यांना हेल्थसह स्मार्ट फीचर्स देखील पाहिजे आहेत. यामध्ये स्लीप ट्रॅकिंग, हार्ट रेट, SpO2, स्ट्रेस आणि HRV मॉनिटरिंगसह स्मार्ट टच कंट्रोल आणि रिमोट कॅमेरा सारखे फीचर्स आहेत.
Muse Ring One या लिस्टमधील अॅडवांस आणि प्रीमियम स्मार्ट रिंग मानली जात आहे. यामध्ये मल्टी-LED PPG सेंसर, टेम्परेचर सेंसर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि NFC सपोर्ट आहे.
Ans: Smart Ring ही बोटात घालण्याची स्मार्ट डिव्हाइस असून ती हेल्थ, फिटनेस आणि अॅक्टिव्हिटी डेटा ट्रॅक करते.
Ans: हार्ट रेट, SpO₂, झोपेची गुणवत्ता, स्ट्रेस लेव्हल, कॅलरी बर्न आणि अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग.
Ans: होय, बेसिक हेल्थ ट्रॅकिंगसाठी Smart Ring उत्तम पर्याय ठरते, पण नोटिफिकेशन्ससाठी स्मार्टवॉच जास्त उपयुक्त आहे.






