(फोटो सौजन्य: istock)
स्मार्टफोन ही आज आपली गरज बनली आहे. आजकाल फोन फक्त कॉल करण्यासाठी, संदेश पाठवण्यासाठी किंवा सोशल मीडियासाठी वापरला जात नाही. तर, याद्वारे अनेक कामं घरबसल्या करता येतात. मुख्यतः ऑनलाइन पेमेंट आणि बँकिंग सेवांसाठी स्मार्टफोनची फार मदत होते. आता आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक गरजेचे ॲप्स आपण डाउनलोड करून ठेवतो. मात्र हे सर्व ॲप्स सेफ असतात असे नाही. जर स्मार्टफोनमध्ये असलेल्या ॲप्समध्ये मालवेअर म्हणजेच व्हायरस असेल तर त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. हे मालवेअर किंवा व्हायरस तुमची पर्सनल माहिती चोरून हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकतात आणि त्यानंतर तुमची फसवणूकही होऊ शकते. अशा परिस्थितीत फोनमध्ये असलेले ॲप्स सुरक्षित आहेत की नाही हे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.
गुगलने काही वर्षांपूर्वी Android स्मार्टफोन युजरसाठी Google Play Protect फीचर आणले होते. हे Google Play Store वरून डाउनलोड केलेले ॲप्स वेळोवेळी तपासते. याशिवाय, ते तुमचा स्मार्टफोन स्कॅन करण्याचे काम करते. तुमच्या फोनवरील कोणत्याही ॲपमुळे हानी होण्याचा धोका असल्यास, हे फीचर तुम्हाला त्याची माहिती देईल. हे फिचर फार कामाचे असून चला, याचा वापर कसा करायचे ते जाणून घेऊया.
असे युज करा Google Play Protect
भारतातील प्रत्येक मोबाईल नंबर +91 ने का सुरू होतो? जाणून घ्या यामागचे रंजक कारण
हे देखील लक्षात ठेवा
गुगल प्ले स्टोअरवरून कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्या ॲपच्या डेटा प्रायव्हसी सेक्शनमध्ये जा आणि ॲपचे डिसक्रिप्शन आणि स्क्रीनशॉट तपासा. जर तुम्हाला संशयास्पद चिन्हे जसे की पॉप-अप जाहिराती दिसत असतील तर, तुम्ही समजून घेतले पाहिजे की या ॲपमध्ये मालवेअर असू शकतो. ते ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू नका.
Google Play Store वरून कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी, Google Play Protect चा व्हेरिफिकेशन बॅज देखील तपासा. व्हेरिफिकेशन बॅज असलेले ॲप्स फोनसाठी सुरक्षित मानली जातात. याशिवाय कोणत्याही थर्ड पार्टी स्टोअर किंवा लिंकद्वारे तुमच्या फोनवर कोणतेही ॲप कधीही डाउनलोड करू नका.