Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स
Samsung Galaxy Buds 3 FE निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच करण्यात आले आहेत. हे साउथ कोरियन टेक कंपनीचे नवीन बजेट ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन्स आहेत. हे ईयरबड्स Galaxy Buds FE चा सक्सेसर म्हणून लाँच करण्यात आला आहे, जे ऑक्टोबर 2023 मध्ये लाँच करण्यात आले होते. Galaxy Buds 3 FE मध्ये एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) आणि Galaxy AI फीचर्स देण्यात आले आहे. TWS ईयरबड्स पिंच आणि स्वाइप जेस्चर सपोर्ट आहेत. Samsung ने दावा केला आहे की, ANC बंद राहिल्यास ईयरबड्स एका चार्जवर 8.5 तासांची बॅटरी लाईफ देतात.
Samsung Galaxy Buds 3 FE ची किंमत अमेरिकेमध्ये 149.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 13,000 रुपये ठेवण्यात आली आहे. Galaxy Buds 3 FE यापूर्वीच्या मॉडेलपेक्षा 50 डॉलर्सनी महाग आहेत. यापूर्वी लाँच करण्यात आलेल्या ईएरबड्सची किंमत 99.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,700 रुपयांनी जास्त आहे. TWS ईयरबड्स निवडक ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले असून 4 सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरु होणार आहे. हे ईअरबड्स ब्लॅक आणि ग्रे या दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy Buds 3 FE मध्ये टीडब्ल्यूएस ईयरबड्सच्या बीनसारख्या डिझाइनला बाजूला ठेवून स्टेम डिझाइन देण्यात आले आहे. प्रत्येक इयरबडमध्ये डायनॅमिक ड्रायव्हर आहे आणि त्याचे वजन 5 ग्रॅम आहे. चार्जिंग केसचे वजन 41.8 ग्रॅम आहे. निवड करण्यासाठी ते ब्लेडद्वारे पिंच इंटरॅक्शनला सपोर्ट करतात. वॉल्यूम कंट्रोल स्वाइप जेस्चरने देखील केले जाऊ शकते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, क्रॅडलवर डेडिकेटेड पेयरिंग बटन आहे, ज्याच्या मदतीने Galaxy डिवाइसेज अगदी सहजपणे स्विच केले जाऊ शकते. Galaxy Buds 3 FE ऑटो स्विचने सुसज्ज आहे, जे ऑडियो एक्टिविटीला ऑटोमॅटिक डिटेक्ट करून कनेक्शन दुसऱ्या गॅलेक्सी डिव्हाईसवर ट्रांसफर करतात. ज्यामुळे ऐकण्यात कोणताही व्यत्यत येत नाही.
Samsung Galaxy Buds 3 FE ANC ला सपोर्ट करतो, ज्यामुळे एंबिएंट नॉइजमुळे व्यत्यय येणार नाही. यामध्ये क्रिस्टल क्लियर कॉल टेक्नोलॉजी देखील देण्यात आली आहे, जे एक प्री-ट्रेंड मशीन लर्निंग मॉडेलचा वापर करून तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे कॉलदरम्यान स्पीकरचा आवाज वेगळा करता येतो आणि पार्श्वभूमीचा आवाज कमी करता येतो.
कंपनीने यामध्ये अनेक AI-बेस्ड फीचर्स देखील दिले आहेत. यामध्ये “Hey Google” वॉयस कमांडसह Gemini ला हँड्स-फ्री एक्सेस केला जाऊ शकतो. TWS ईयरबड्स लाइव ट्रांसलेशनला देखील सपोर्ट करतो, ज्यामध्ये Listening Mode आणि Conversation Mode दोन्हींचा समावेश आहे. Samsung ने म्हटलं आहे की, Galaxy Buds 3 FE ANC ऑफ राहिल्यास 8.5 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करतात आणि चार्जिंग केससह एकूण 30 तासांपर्यंत चालण्याचा दावा केला जातो.