सौजन्य - सोशल मिडीया
लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर आपल्याकडे आले होते. यावेळी जानकर यांना निवडून आणण्याचा शब्द आपण दिला होता आणि तो पाळण्यासाठी आपण राम सातपुते यांची ऑफर धुडकावली, पण शब्द मोडला नाही, असे मोहिते पाटील यांनी यांनी स्पष्ट केले.
जयसिंह माेहिते पाटील म्हणाले, राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेला उभा राहू नका, पराभूत व्हाल, असे स्पष्ट मी सांगितले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजयसिंह माेहिते पाटील यांना मानणारे ८० हजारापेक्षा जास्त मतदार आहेत. तुम्ही त्यांना दगा देऊन तिकडे गेल्यास पराभव नक्की होईल. असे सांगूनही सातपुते यांनी ऐकले नाही. विधानसभेतला पुन्हा माळशिरसमध्ये निवडणूक लढविण्यासाठी ते आले असता उभे राहू नका, पुन्हा पराभव हाेईल, असे सांगितले होते. गेल्या वेळी नुसत्या अकलूजकरांनी तुम्हाला १९ हजाराचे लीड मिळवून दिले आणि त्यावेळी जानकर यांचा फक्त २६०० मताने पराभव झाला. याची आठवण जयसिंह मोहिते पाटील यांनी करून दिली.
अकलूजकर बाजीप्रभूप्रमाणे
मोहिते पाटलांचे अकलूजकरांवर आणि अकलूजकरांचे मोहिते पाटलांवर खूप प्रेम आहे. जेव्हा अकलूजकर अडचणीत असतात तेव्हा मोहिते पाटील धावून येतात आणि जेव्हा मोहिते पाटील अडचणीत असतात तेव्हा सर्व अकलूजकर बाजीप्रभूप्रमाणे समोर उभे राहतात, अशा शब्दात अकलूजकरांशी असलेले नाते जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह सर्व २६ उमेदवार मोठ्या फरकाने बाजी मारतील, असा दावाही त्यांनी केला.






