आळंदीतील ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी इंद्रायणी प्रदुषणाकडे प्रशासनच दुर्लक्ष होत आल्याचा आरोप केलाय, या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यां विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलाय. अनेकवेळा इंद्रायणी प्रदूषणाकडे लक्ष वेधून देखील,आठवड्याच्या दर शुक्रवारी इंद्रायणी अशा पद्धतीने फेसाळते या मागचं गौडबंगाल अधिकाऱ्यांना माहीत नाही का असा देखील सवाल ग्रामस्थानी विचारलाय तर,कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीच्या पात्रात मैला आणि केमिकल मिश्रीत पाणी सोडले जात असल्याने इंद्रायांची अक्षरशः गटार गंगा झाल्याचं सांगत, वारंवार मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने , पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळंदीतील ग्रामस्थांनी दिल्याने, इंद्रायणी प्रदुषणाचा प्रश्न चिघळू शकतो अशी शक्यता वर्तवली जातीय.