 
        
        माजी सभापतीना कोर्टाने सुनावली शिक्षा (फोटो- istockphoto)
दोन जणांवर केला होता हल्ला
 जीवेठार मारण्याचा केला प्रयत्न
७ वर्षे ३ महिने कारावास, ७ हजार ३०० रुपये दंड
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील चौडी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इर्नस्टट्यूट येथे बेकायदेशीरपणे तलवार व लोखंडी शिगा, लाकडी दांडके घेऊन घुसून रुपाली थळे, विजय चळे, मनिषा घरत यांच्यासह इतर दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह इतर २० आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्ष ३ महिने कारावास व ७ हजार ३०० रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.३०) सुनावली आहे.
११ सप्टेंबर २०१२ रोजी सायंकाळी ५.४५ ते ६.१५ दरम्यान चोंढी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इर्नस्टट्यूट येथे पूर्व वैमनस्यातून जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाजकल्याण सभापती दिलीप भोईर हे २४ साथीदारांसह घुसले होते. यावेळी त्यांच्या हातात तलवारी, लोखंडी शिगा, लाकडी दांडके होते. आरोपींनी कॉम्प्युटर इनस्टट्यूटमधील साहित्याची तोडफोड करीत रुपाली थळे यांना मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी तसेच शिवीगाळी केली. यावेळी
७ वर्षे ३ महिने कारावास, ७ हजार ३०० रुपये दंड
सदर खटल्याची सुनावणी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात घेण्यात आली, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये जखमी, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, घटनास्थळ पंच प्रसाद गायकवाड यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी दिलीप भोईर यांच्यासह इतर २० जणांना दोषी ठरवीत ७ वर्ष ३ महिने कारावास व ७ हजार ३०० रुपये दंड शिक्षा सुनावली.
Matheran News : भूखंडाचा सावळा गोंधळ; दिवसेंदिवस शहरात वाढतंय अतिक्रमण
दिलीप भोईर यांनी रुपाली थळे यांच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रुपाली धळे यांच्या हाताला दुखापत झाली. यांनतर आरोपींनी रुपाली थळे यांना कॉम्प्युटर इर्नस्टट्यूटमधून बाहेर नेत मारहाण करण्यास सुरुवात केाली. यांनतर थोड्या वेळाने रुपाली धळे यांचे पती विजय धळे आपल्या दोन मित्रांसह घटनास्थळी आले व त्यांनी रुपाली थळे यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिलीप भोईर यांनी विजय चळे यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला व इतर आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच विजय थळे यांच्या दोन मित्रांसह बहीण मनिषा घरत यांनादेखील आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.






