बिहार सरकारमध्ये नोकरीची संधी (फोटो- istockphoto)
बिहारमध्ये 694 पदांवर सरकारी भरती होणार
नितीश कुमार सरकारने दिली मंजूरी
कृषी विभागात होणार मेगाभरती
प्रत्येक तरुण तरुणीचे स्वप्न असते की आपल्याला सरकारी नोकरी मिळावी. सरकारी नोकरी करायला मिळावी. प्रत्येकजण त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो. दरम्यान सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कृषी विभागाने सरकारी नोकर भरती करण्याचे ठरवले आहे. बिहार राज्यात ही भरती केली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
बिहार सरकार मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत याला मंजूरी देण्यात आली आहे. अनेक विभागात पदभरती केली जाणार आहे. कृषी विभागात 694 पदांवर भरती केली जाणार आहे. तसेच अन्य विभागात देखील पदभरती केली जाणार आहे.
त्यासोबतच पटणा हायकोर्टात मानधन आणि कंत्राटी स्वरूपात चार कायदेशीर सहायक पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच सरकारी पॉलिटेक्निक विभागात 45 शैक्षणिक पदे व 61 बिगर शैक्षणिक पदांसाठी भरती होणार आहे. एकूण 106 पदांसाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
सीकर टेरिटोरियल आर्मी भरती! नोकरी-शिक्षण करतानाच देशसेवेची संधी
सरकारी नोकर भरतीच्या मान्यतेसोबत नितीश कुमार सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईत 314 कोटी रुपयांच्या बिहार भवन बांधकामाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच उच्च शिक्षण संचलनयात 9 पदे निर्माण करण्यात मंजूरी दिली आहे.
सीकर टेरिटोरियल आर्मी भरती
प्रादेशिक सेना ही भारतीय नागरिकांना त्यांच्या नियमित नोकरी किंवा शिक्षणासोबत देशसेवा करण्याची अनोखी संधी देते. या सेनेत पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. टेरिटोरियल आर्मी ही भारतीय सेनेचाच एक भाग असून आपत्कालीन परिस्थिती, अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित गरजांमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे पूर्णवेळ सैन्यसेवा शक्य नसलेल्या तरुणांसाठी हा उत्तम पर्याय मानला जातो.
REET साठी करताय अर्ज? पहिला भरतीच्या रीतीभाती जाणून घ्या; इतका पगार मिळतो
सीकर प्रतिनिधी राहुल मनोहर यांच्या माहितीनुसार, अनेक तरुणांना भारतीय सेनेत जाण्याची इच्छा असते; मात्र त्यासाठी पूर्णवेळ समर्पण आवश्यक असल्याचा गैरसमज असतो. प्रत्यक्षात टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून नागरी नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण सुरू ठेवताही सैन्यसेवा करता येते. खासगी व शासकीय कर्मचारी, विविध व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच स्वयंरोजगार करणारे नागरिकही या भरतीस पात्र असतात. टेरिटोरियल आर्मीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात, तर दुसरी परीक्षा जुलै किंवा ऑगस्टमध्ये आयोजित केली जाते. अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून तो कोणत्याही रोजगारात किंवा व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणे अपेक्षित आहे. उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४२ वर्षे असावे.






