राजधानी दिल्लीत भीषण स्फोट (फोटो- सोशल मिडिया)
Delhi Blast Live: दिल्लीमध्ये सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी एक चारचाकी गाडी हळू हळू रेड सिग्नला येऊन थांबली. आणि अचानक आगीचा भडका उडाला. त्याचसोबत मोठा स्फोटाचा आवाज झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ हा स्फोट झाला असून यामुळे दिल्लीसह संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर देशातील मुंबईसह महत्वाच्या ठिकाणी शहरांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.
त्याचदरम्यान, आता दिल्ली पोलीस कमिशनर सतीश गोलचा यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तपास यंत्रणेने तात्काळ कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तसेच, या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, FSL , NIA , NSG याठिकाणी दाखल झाले होते. या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांनाही प्रचंड आग लागली होती.
या दुर्घटनेत बरेच जण जखमी झाले असून यात घटनेत अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दखल घेत यासंबधित सगळी माहिती मागून घेतली आहे. ज्या कारचा स्फोट झाला होता ती कार हरियाणाची असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटात वापरली गेलेली कार ही खान नावाच्या माणसाची असून याबद्दल पुढील तपास सुरू आहे.
स्फोटाने हादरली दिल्ली!
दिल्लीतील लाल किल्लाच्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ असलेल्या पार्किंगच्या सिग्नलला उभ्या असलेल्या कारचा अचानक भडका उडाला. सिलेंडरचा स्फोट झाल्याचे आधी काहींना वाटलं पण नंतर त्या स्फोटाची गंभीरता लक्षात आली. पोलीस प्रशासन घटनास्थळी दखल झाल्यावर त्यांनी संपूर्ण परिसर रिकामी केला. स्फोटाच्या अग्नितांडवामुळे अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तसेच एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले असून त्याचसोबत फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. या स्फोटाचे पुरावे गोळा करायचे काम सुरु आहे.
दिल्ली किल्ल्याजवळ पुन्हा एकदा झाला मोठा ब्लास्ट
हा ब्लास्ट झाल्यानंतर त्या परिसरातील दुकानांना त्वरित अलर्ट जारी करण्यात आला. चांदणी चौकातील भगीरथ पॅलेस परिसरातही ब्लास्टचे धक्के जाणवले आणि दुकानदार एकमेकांना फोन करून परिस्थितीची विचारपूस करताना दिसले. अनेक बसेस आणि इतर वाहनांना आग लागल्याचे वृत्त आहे. दिल्लीत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत अनेक वेळा दिल्ली ब्लास्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा घटनाक्रम जाणून घेऊया.






