पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan news in Marathi : कराची : एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतात एक भीषण स्फोट झाला आहे. एका फटाक्यांच्या कारखान्यात ही घटना घडली आहे. शनिवारी (१५ नोव्हेंबर) घडलेल्या या घटनेत सात जणांच्या मृत्यूचे वृत्त मिळाले आहे. तसेच अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई; २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांततील हैद्राबाद शहरात लतीफाबाद येथे हा स्फोट झाला. एका अवैध कारख्यान्यात ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच बचाव व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आग विझवण्यात आली असून आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या स्फोटात कारखान्याजवळी एका घराचा काहीसा भागही कोसळला आहे. यामुळे मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे.
सध्या या स्फोटामागचे कारण अस्पष्ट आहे. पाकिस्तानचे बचाव अधिकाऱ्या दिलेल्या माहितीनुसार, लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढल्यानंतर घटनेची चौकशी करण्यात येईल. या ढिगाऱ्यांखाली कामगार आणि लहान मुले अडकली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये आग विझवल्यानंतर हवेत धुर पसरलेला दिसत आहे. तसेच बचाव अधिकाऱ्यांचे लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.
लतीफाबादच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांचा कारखाना अवैध होता. कारखाना मालक असद झाई सध्या फरार आहे. सध्या त्याच्या इतर कारखान्यांच्या परवान्याची पडताळणी केली जात आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून अनेकजण ९८% भाजले गेले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. दोन महिन्यापूर्वी कराचीतील अशाच एक बेकायदेशीर कारखान्यात स्फोट झाला होता. ज्यामध्ये ३३ जण जखमी झाले होत, तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. सध्या नुकत्याच घडलेल्या स्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
⚡ BREAKING: A powerful explosion has been reported in Hyderabad, Sindh, Pakistan. Building collapses, several people reported buried under rubble The blast occurred near the Machi Goth airport area, with tremors felt across a wide radius.ore details awaited. https://t.co/12bBqqNShX pic.twitter.com/RJe6RprP5W — OSINT Updates (@OsintUpdates) November 15, 2025
Ans: पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील हैद्राबाद येथील लतीफाबाद येथे भीषण स्फोट झाला आहे.
Ans: पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील हैद्राबाद येथील लतीफाबाद एक फटक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.
Ans: लतीफाबाद येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू, तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत.






