सौजन्य - नवराष्ट्र टीम
दुर्गंधीमुळे श्वास घेणे अवघड होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यामार्गे कंपन्यांमध्ये भेटीसाठी परराज्यातील व परदेशातील उद्योगपती आणि अधिकारी नियमित ये-जा करतात. परिसरातील ही अस्वच्छता शहराची प्रतिमा मलिन करत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष ?
संबंधित विभागास वारंवार निदर्शनास आणून देऊनही कचरा गोळा करण्याची योग्य व्यवस्था न झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरत आहे.
कचरा जाळल्याची धक्कादायक माहिती
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी कचरा जाळला जातो, ज्यामुळे परिसरात धुराचे प्रदूषण वाढतेच, शिवाय रस्त्याच्या कडेला टाकलेल्या केबल लाईन जळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान आणि संपूर्ण परिसरातील सेवा व्यवस्थेत बिघाड होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर आंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
नागरिकांच्या मागण्या काय आहेत?






