दिल्लीला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
नवी दिल्ली: मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, नवी दिल्ली , महाराष्ट्र अशा सर्वच राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनने आता उत्तर भारत देखील व्यापला आहे. दिल्ली, लडाख, लेह, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आशा सर्वच राज्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पुढील दोन दिवस पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान,चंदीगड अशा राज्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजधानी दिल्लीत पुढील एक दोन दिवस अत्यंत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात जोरदार पाऊस होऊ शकतो.
26 जूनपर्यंत हवामान विभागाने मध्यप्रदेश, गुजरात, कोकण, गोवामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. पुढील तीन दिवस किनारपट्टी आणि उत्तर आणि पूर्व भारतात अति ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. 2013 मध्ये राजधानी दिल्लीमध्ये 16 जून रोजी मान्सून दाखल झाला होता.
महाराष्ट्राला 48 तासांचा मुसळधार पावसाचा इशारा
गेले काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टयाला पावासाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. अशातच आता मुंबई आणि उपनगरांना पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.मुंबई आणि उपनगरात काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अतिमुसळधार पावसाचा अंदाज
पुढचे 48 तास कोकणासह पश्चिम माहाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्य़ानुसार कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. खासकरुन रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असा इशारा देण्यात आलेला आहे. बंगालाच्या उपसागराचं तापमान वाढल्याने मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होत आहे.
गेले काही दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा, तर पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरि