gaja marne( फोटो सौजन्य: pinterest)
गजानन ऊर्फ गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी कोथरूडमधील एका राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. पुढे त्याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली. पुण्यात कुख्यात गुंड गजानन उर्फ गज मारणे याला पोलिसांच्या संरक्षणात असताना सांगली कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी थेट त्याने मध्यरस्त्यात महामार्गावरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आधी कोयत्याने सपासप वार, नंतर स्वतःही घेतला गळफास; परळी हादरली!
याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आणि गजा मारणेनी मिळून ‘कनसे ढाब्या’वर मटण पार्टी केल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भनक लागली. त्यानंतर अमितेश कुमार त्यांनी सीसीटीव्ही चेक केले. त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. गजा मारणेला भेटायला दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. सोबतच एक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांची नावे काय?
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरूज राजगुरू
पोलीस हवालदार महेश बामगुडे
पोलीस हवालदार सचिन मेमाने
पोलीस शिपाई राहुल परदेशी
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे काय?
सतीश शिळीमकर
विशाल धुमाळ
बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते
गजा मारणेला भेटण्यासाठी आलेले सहकारी कोण?
गजा मारणेला भेटण्यासाठी दोन फॉर्च्युनर आणि एका थार गाडीने तीन व्यक्ती कनसे ढाब्यावर आले होते. त्यांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला आणि नंतर गजाला ढाब्यावर जेवण पुरवले. विशाल धुमाळ खुनाचा गुन्हा तर पांड्या मोहिते हा गजा मारणेच्या टोळीतील शूटर असल्याचे समोर आले आहे.