फोबी लिचफिल्ड(फोटो-सोशल मीडिया)
ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, त्यांची २५ धावांवर पहिली विकेट गेली. हिली ५ धावांवर बाद झाली. परंतु लिचफिल्ड आणि तिसऱ्या क्रमांकवर आलेली एलिस पेरीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघींनी १५५ धावांची भागीदारी रचली. दरम्यान लिचफिल्डने ७७ चेंडूत कारकीर्दीमधील आपले तिसरे शतक पूर्ण केले. तिने सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला.
लिचफिल्डने भारतीय वेगवान गोलंदाज क्रांती गौड आणि अनुभवी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मावर चांगलाच हल्ला चढवला. तिने खेळपट्टीच्या गतीचा उत्कृष्ट वापर करत सातत्याने चौकार लगावले. तिने फक्त ४५ चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर, ती अधिक धोकादायक बनत गेली आणि प्रत्येक षटकात तिने धावा काढायला सुरुवात केली आणि आपले शतक पूर्ण केले. अखेर अमनजोत कौरनेलिचफिल्डला ११९ धावांवर माघारी पाठवले. तिने ९३ चेंडूत ११९ धावा केल्या. या खेळीत तिने १५ चौकार लगावले.
फोबी लिचफिल्डच्या विक्रमी खेळीने रचला इतिहास
२२ वर्षीय तरुण फोबी लिचफिल्डचा हा पहिलाच एकदिवसीय विश्वचषक आणि स्पर्धेतील तिचे पहिला शतक होते. टीम इंडियाविरुद्ध हे तिचे दुसरे शतक होते. तिच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत मोठ्या धावसंख्येच्या मार्गावर नेऊन ठेवले.
ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.






