पाकिस्तानी संघात 'उलटं-सुलटं' प्रकरण (Photo Credit- X)
Pakistan National Cricket Team: टी-२० आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानी संघाला भारताकडून ७ विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर, पाकिस्तानने यूएईला हरवून कशीबशी सुपर-४ मध्ये जागा मिळवली. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाने बराच गोंधळ घातला होता, ज्यामुळे सामना एक तास उशिरा सुरू झाला. सध्या पाकिस्तानी संघातील खेळाडू एकजुटीने कामगिरी करू शकलेले नाहीत आणि त्यांच्या कर्णधाराचेही कोणतेही डाव यशस्वी होत नाहीत. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघात खेळाडूंच्या भूमिकेबाबत ‘उलटं-सुलटं’ परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानी संघाचा सलामीचा फलंदाज साम अयूब फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याला या स्पर्धेत एकही धाव काढता आलेली नाही. त्याने खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाला. मात्र, गोलंदाजीमध्ये त्याने कमाल केली आहे. साम अयूब हा या स्पर्धेत पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ३ सामन्यांमध्ये एकूण ६ विकेट्स घेतल्या आहेत.
What a team #Pakistan is..U don’t know who plays as batter ,nd who as bowler..Ths who r supposed to bat r doing bowling nd ths who r supposed to ball r batting well..#saimayub nd #ShaheenAfridi r perfct eg’s of this.Pak needs to play full 6 batters to fancy any chance.#AsiaCup pic.twitter.com/ezofl1JS8A
— Mir Faisal (@mirfaisal12128) September 17, 2025
दुसरीकडे, शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानी संघाचा मुख्य गोलंदाज आहे. पण गोलंदाजीत त्याने ३ सामन्यांत फक्त ३ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु, फलंदाजीमध्ये त्याने आपले कौशल्य दाखवले आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तानसाठी खालच्या फळीत फलंदाजीला येतो. त्याने भारत आणि यूएईविरुद्ध चांगली फलंदाजी केली आहे. भारतासमोर त्याने १६ चेंडूंमध्ये ४ षटकारांसह ३३ धावा केल्या, तर यूएईविरुद्ध त्याने १४ चेंडूंत २ षटकारांसह २९ धावा ठोकल्या. या स्पर्धेत तो पाकिस्तानसाठी सर्वाधिक ६ षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. यावरून, पाकिस्तानी संघात सध्या काहीही नियोजित होत नाही, हे स्पष्टपणे दिसून येते.
पाकिस्तानचे नाटक काही संपेना! आता थेट मॅच रेफरी भारताचा ‘फिक्सर’; तर सोशल मीडियावर खोटेपणा उघड
२०२५ च्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांनी ग्रुप ए मधून सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांचा पुढचा सामना २१ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ग्रुप ए मधील दमदार कामगिरीनंतर भारत सुपर फोरसाठी पात्र ठरला. दुसरीकडे, पाकिस्तानला पुढच्या फेरीत पोहोचण्यात यश आले. टीम इंडियाने आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने खेळले आहेत, दोन्ही सामने जिंकले आहेत आणि अव्वल स्थानावर आहे.