फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Sajid Khan’s statement : पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, आज न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये एक दिवसीय मालिकेचा शेवटचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभूत करून या मालिकेमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या संघाने या मालिकेचे सर्व सामने जिंकून मालिका ३–० अशी नावावर केली आहे. याच दरम्यान आता पाकिस्तानी क्रिकेट संघामधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या साजिद खाने अलीकडेच एक टेलिव्हिजन मुलाखतीवर एक विधान केले आहे आणि या विधानाने क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडाली आहे.
साजिद खान याला जर तो क्रिकेटपटू नसता तर तो काय असता असे विचारले असे त्याने गमतीने उत्तर दिले की जर मी क्रिकेट खेळाडू नसतो तर ‘मी गुंड झालो असतो’ साजिद खानचा हे उत्तर ऐकून शोचे होस्ट आणि प्रेक्षक आहे जोरजोरात हसायला लागले पण आता या विधानाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sajid Khan said, “If I wasn’t a cricketer, I’d be a gangster.” pic.twitter.com/jMLnvwucgI
— 𝙎𝙝𝙚𝙧𝙞 (@CallMeSheri1) April 3, 2025
पाकिस्तानी वृत्तवाहिनी एआरवाय न्यूजवरील एका रॅपिड फायर सत्रामध्ये साजिद खानला अनेक प्रश्न विचारण्यात आले. शोच्या होस्टने साजिदला थेट प्रश्न विचारला की जर तू क्रिकेटर नसतास तर तू काय झाला असतास? या प्रश्नाच्या उत्तरात तो न डगमगता म्हणाला की मी गुंड असतो. हे ऐकून, तिथे असलेल्या प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही आणि तो म्हणाला की तुम्ही हे व्यक्तिमत्व धारण करत आहात. रॅपिड-फायर सत्रादरम्यान, साजिद खानने बाबर आझमला जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले तर विराट कोहलीला “आतापर्यंतचा सर्वोत्तम भारतीय खेळाडू” असे संबोधले.
साजिद खानने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी अनेक महत्त्वाचे सामने खेळले आहेत. शान मसूदच्या नेतृत्वाखाली त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. पाकिस्तानने पहिली कसोटी गमावली होती, पण जेव्हा साजिदला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघात समाविष्ट करण्यात आले तेव्हा त्याने परिस्थिती बदलली. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे पाकिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली. साजिदने आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळले आहेत आणि ५९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी २७.२८ आहे.