Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले
नेमकं काय प्रकरण?
२२ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री वालूर येथील श्रीकृष्ण मंदिरात अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला होता. तेथे दत्तराव भोकरे आणि सुरूबाई भोकरे या वृद्ध दांपत्याला बेदम मारहाण करून त्यांच्या कानातील दागिने हिसकावले. त्यानंतर शेजारच्या शेत आखाड्यावर झोपलेला तरुण संतोष सोनवणे याच्यावर लोखंडी गजाने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्याची आजी वच्छलाबाई यांनाही मारहाण करून दागिने लुटून दरोडेखोर फरार झाले होते.
पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी विशेष पथके नेमली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विवेकानंद पाटील यांनी झरी येथील ९ ऑक्टोबरच्या घटनेचा अभ्यास केला. झरी आणि वालूर या दोन्ही ठिकाणी दरोडेखोरांची अंगकाठी आणि गुन्हा करण्याची पद्धत सारखीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हाच धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा केले. वेगाने आपली तपासाची चक्रे फिरवत १५ जानेवारीला सापळा रचून बाबुराव पवारला ताब्यात घेतले. त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
कसा रचला दरोड्याचा कट
बाबुराव पवारने दिलेल्या माहितीनुसार, वालूरमध्ये चोरी करण्यापूर्वी त्यांनी दुपारी त्याच मंदिरात चहा पिला होता. तिथेच रात्रीचा ‘प्लॅन’ ठरला. खून आणि दरोड्या नंतर त्यांनी पार्डी येथून एक दुचाकी चोरून पळ काढला होता. सध्या आरोपी २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्याचे इतर दोन साथीदार आणि चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी सेलू पोलीस अधिक तपास करत आहे.
Ans: २२ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या रात्री परभणी जिल्ह्यातील वालूर येथे.
Ans: झरी व वालूर येथील गुन्ह्यांची पद्धत सारखी असल्याने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
Ans: फरार दोन साथीदारांचा शोध आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.






