लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र, शशिकांत शिंदे सरकारवर भडकले...
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून चर्चा सुरु आहेत. राज्य सरकारने राज्यातील ८० लाख महिला या योजनेस अपात्र असल्याचे ठरवत त्यांचे नाव योजनेतून काढून टाकले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘निवडणुकीपर्यंत आश्वासने द्यायची, मते घ्यायची आणि नंतर नियम व निकषांच्या नावाखाली लाभार्थी महिलांची संख्या कमी करायची, ही भूमिका अत्यंत दुर्दैवी आहे,’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यात मोठ्या गाजावाजासह सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या गेमचेंजर ठरली होती. मात्र आता या योजनेतील तब्बल ८१ लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. बँक पडताळणी, ई-केवायसी मोहीम आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या माहितीची काटेकोर छाननी केल्यानंतर महिला व बालविकास विभागाने ही मोठी कपात केली आहे. या धडक कारवाईमुळे सुरुवातीला मोठ्या संख्येने लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी देखील राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच आता शशिकांत शिंदे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
शशिकांत शिंदे यांनी ट्विट करत म्हंटले, “बहिणींवर कधीही अन्याय होऊ देणार नाही अशी भाषा करणारे ‘लाडक्या बहिणींचे भाऊ’ आज कुठे आहेत? निवडणुकीपूर्वी लाखो महिलांना लाभ देत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र आता तब्बल ८० लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. पुढे आणखी किती महिलांवर ही वेळ येणार, याचीही खात्री नाही. निवडणुकीपर्यंत आश्वासने द्यायची, मते घ्यायची आणि नंतर नियम व निकषांच्या नावाखाली लाभार्थी महिलांची संख्या कमी करायची, ही भूमिका अत्यंत दुर्दैवी आहे.”
बहिणींवर कधीही अन्याय होऊ देणार नाही अशी भाषा करणारे ‘लाडक्या बहिणींचे भाऊ’ आज कुठे आहेत? निवडणुकीपूर्वी लाखो महिलांना लाभ देत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र आता तब्बल ८० लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. पुढे आणखी किती महिलांवर ही वेळ येणार, याचीही खात्री… — Shashikant J Shinde (@shindespeaks) June 2, 2026
“आज महाराष्ट्रातील तमाम बहिणींनी विचार करण्याची गरज आहे की, निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि निवडणुकीनंतरची कृती यामध्ये एवढी तफावत का? हे फसवे भाऊ आपल्याला हवेत का? ज्या लाडक्या बहिणींनी यांना मतदान करून सत्ता दिली, त्यांनीच आता या कपटी भावांची सत्ता उलटून लावली पाहिजे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शेतकरी कर्जमाफी मंजूर तरीही बच्चू कडू आंदोलनावर ठाम, “केवळ कर्जमाफी करून चालणार नाही तर…”
सरकारला कोंडीत पकडत, जयंत पाटील यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, कोणत्याही योग्य छाननीशिवाय किंवा कठोर पडताळणीशिवाय इतक्या मोठ्या संख्येने व्यक्तींना या योजनेत समाविष्ट करण्याचा मूळ आधार तरी काय होता? आपला संशय व्यक्त करताना ते म्हणाले, “जर हे ८० लाख लाभार्थी पूर्णपणे बोगस किंवा अपात्र होते, तर सरकारने गेल्या २० महिन्यांपासून त्यांना लाभ देणे का सुरू ठेवले होते? हा पूर्वनियोजित भ्रष्टाचार होता का, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीला २४,००० कोटी रुपयांचा थेट फटका बसला आहे? या प्रचंड आर्थिक नुकसानीसाठी, अंतिमतः जबाबदार कोण आहे?”
कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा की आणखी एक जुमला? हर्षवर्धन सकपाळ यांचे मोठे वक्तव्य






