(फोटो सौजन्य: Mammoth Lakes Tourism)
थंडीच्या या सुंदर वातावरणात तुम्हीही फिरायला जाण्याचा आणि आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. चांगल्या बजेटसह जर तुम्ही एका सुंदर ठिकाणी कॅम्पिंगचा विचार केला असेल तर कॅलिफोर्नियातील मॅमोथ लेक्स हे कॅम्पिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे 800हून अधिक कॅम्पसाइट्स आहेत. निसर्ग आणि साहसप्रेमींना येथे डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगल, विविध प्रकारची झाडे आणि अनोखे अनुभव मिळतात. प्रसिद्ध ट्रेलहेड्सजवळ असलेल्या या कॅम्पसाइट्स भटकंती करणाऱ्या प्रवाशांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत, कारण येथे मॅमोथ लेक्सच्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येतो.
मॅमोथ लेक्सच्या खोऱ्यातील कॅम्पग्राउंड्स
रस्त्याद्वारे सहज पोहोचता येणाऱ्या मॅमोथ लेक्स खोऱ्यात पाच कॅम्पसाइट्स आहेत, जिथे मागच्या बाजूला ट्रेल्स आणि सुंदर तलाव आहेत. कॅम्पिंगसह येथे बोटिंग, कयाकिंग, सायकलिंग आणि इतर साहसी उपक्रमांचाही आनंद घेता येतो. या संपूर्ण भागात मॅमोथ लेक्स ट्रॉलीच्या मदतीने सहज जाता येते, अगदी मुख्य मार्गांपासून दूर असलेल्या कॅम्पसाइट्सपर्यंतही पोहोचता येते.
ट्विन लेक्स कॅम्पग्राउंड
हे मॅमोथ लेक्स खोऱ्यातील सर्वात मोठे कॅम्पग्राउंड असून, तामारॅक लॉजजवळील लोअर आणि अपर ट्विन लेक्सच्या किनारी तब्बल 94 कॅम्पसाइट्स आहेत. या भागातून अनेक ट्रेल्सना सुरुवात होते, कारण खोऱ्याचा मार्ग कॅम्पसाइटमधून जातो, ज्यामुळे सर्व वयोगटांसाठी रोमांचक आउटडोअर अनुभव मिळतो.
सर्वात थरारक रस्ता! 30000 किमीचा तो महामार्ग जो 14 देशांना ओलांडतो, ना कोणता जोडरस्ता ना कोणते वळण…
कोल्डवॉटर कॅम्पग्राउंड
लेक मेरीच्या दक्षिण टोकावर, घनदाट पाइन जंगलामध्ये वसलेले कोल्डवॉटर कॅम्पग्राउंड हे कोल्डवॉटर आणि एमराल्ड लेक ट्रेलहेड्सजवळ आहे. दोन्ही बाजूंनी ओढे वाहत असल्यामुळे या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात एक अनोखा आणि रोमांचक कॅम्पिंग अनुभव मिळतो. येथे एकूण 74 कॅम्पसाइट्स आहेत, ज्या साहसप्रेमींसाठी खास आकर्षण ठरतात.
लेक जॉर्ज कॅम्पग्राउंड
मॅमोथ लेक्समधील तुलनेने लहान कॅम्पग्राउंड असलेल्या लेक जॉर्जमध्ये तलावाच्या काठावर 16 कॅम्पसाइट्स आहेत. या ठिकाणाजवळ टीजे आणि बॅरेट लेक्ससारखे काही ट्रेलहेड्स आहेत, जे भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
लेक मेरी कॅम्पग्राउंड
लेक मेरीच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले लेक मेरी कॅम्पग्राउंड लॉजपोल पाइनच्या जंगलामध्ये असून, येथून अप्रतिम निसर्गदृश्यांचा आनंद घेता येतो. या कॅम्पग्राउंडमधील 10 कॅम्पसाइट्सपैकी, लेक मेरीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले पाइन सिटी कॅम्पग्राउंड हे या परिसरातील सर्वात लहान आहे. तसेच, हे एकमेव कॅम्पग्राउंड आहे जिथे रिझर्वेशन्स स्वीकारले जात नाही; येथे प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जातो.
रेड्स मेडो कॅम्पग्राउंड
मॅमोथ माउंटनच्या पश्चिम बाजूला, मिडल फोर्क सॅन जोक्विन नदीच्या खोऱ्यात वसलेल्या रेड्स मेडो व्हॅलीमध्ये एकूण 6 कॅम्पग्राउंड्स आहेत आणि येथे वैविध्यपूर्ण अनुभव घेण्याची संधी मिळते. रेड्स मेडो कॅम्पग्राउंडमध्ये 54 कॅम्पसाइट्स असून, ते या खोऱ्यातील सर्वात मोठे कॅम्पग्राउंड आहे. गरम पाण्याच्या
मोफत स्नानगृहांसह इतरही अनेक सुविधा येथे उपलब्ध असल्यामुळे हे ठिकाण भटकंती करणाऱ्यांमध्ये आणि कॅम्पिंगसाठी येणाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
मिनारेट फॉल्स कॅम्पग्राउंड
24 कॅम्पसाइट्स असलेले हे कॅम्पग्राउंड मिनारेट क्रीक सॅन जोएक्विन नदीत विलीन होण्याच्या ठिकाणी वसलेले आहे. धबधब्यांचे मनमोहक दृश्य आणि फोटोजसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम असून, निसर्गप्रेमी आणि साहस शोधणाऱ्यांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहे.
प्युमिस फ्लॅट
नदीकिनारी वसलेले पुमिस फ्लॅट हे मासेमारीसाठी लोकप्रिय कॅम्पग्राउंड आहे. परिसरातील तुलनेने लहान कॅम्पग्राउंड्सपैकी एक असले तरी, येथे मोठ्या गटांसाठी स्वतंत्र ग्रुप कॅम्पसाइटची सुविधाही उपलब्ध आहे.
अप्पर सोडा स्प्रिंग्स कॅम्पग्राउंड
29 कॅम्पसाइट्स असलेल्या अप्पर सोडा स्प्रिंग्स कॅम्पग्राउंडला भेट देऊन नदीकिनारी कॅम्पिंगचा थरार अनुभवता येईल. हायकिंग ट्रेलहेडजवळ वसलेल्या या कॅम्पग्राउंडवरून रिव्हर ट्रेलपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध आहे आणि मासेमारीसाठीही हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे.
ॲग्न्यू मेडोज कॅम्पग्राउंड
अॅग्न्यू मेडोज पॅकजवळ वसलेले अॅग्न्यू मेडोज कॅम्पग्राउंड हे प्रसिद्ध पॅसिफिक क्रेस्ट ट्रेलसाठी एक महत्त्वाचे ट्रेलहेड आहे. नदीच्या काठावर उंच कड्यावर वसलेले हे कॅम्पग्राउंड अप्रतिम निसर्गदृश्यांसह उत्कृष्ट कॅम्पिंग अनुभव देते.
न्यू शेडी रेस्ट आणि ओल्ड शेडी रेस्ट
शहराच्या मुख्य भागापासून जवळच, दुकाने आणि रेस्टॉरंट्सच्या सोयींसह मॅमोथ वेलकम सेंटरच्या मागील पाइन जंगलात वसलेल्या न्यू आणि ओल्ड शेडी रेस्ट कॅम्पग्राउंडमध्ये 141 कॅम्पसाइट्सची सुविधा उपलब्ध आहे.
मॅमोथ आरव्ही पार्क
हे कॅम्पग्राउंड वर्षभर खुले असून, परिसरातील एकमेव खासगी कॅम्पग्राउंड आहे, जिथे संपूर्ण आणि अंशतः हुक-अप सुविधा तसेच केबिन्स आणि तंबूंसाठी जागा उपलब्ध करून आहेत. मॅमोथ वेलकम सेंटरच्या समोर, शहराजवळ वसलेल्या या ठिकाणी आधुनिक सुविधांसह कॅम्पिंगचा अनुभव मिळतो. येथे गरम पाण्याचे स्नानगृह, लॉन्ड्री, तापवलेले स्विमिंग पूल आणि स्पा तसेच पाणी भरण्यासाठी आणि टाकी रिकामी करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहेत.
शेरविन क्रीक कॅम्पग्राउंड
शहराच्या दक्षिणेस काही मैलांवर, शेरविन क्रीक रोडवर वसलेल्या शेरविन क्रीक कॅम्पग्राउंडमध्ये 85 कॅम्पसाइट्ससह पाइन जंगलाच्या शांत छायेत निवांत कॅम्पिंगचा अनुभव मिळतो.