सध्या गणेशोत्सवनिमित्त सर्वत्र उत्साहाचे आणि प्रसन्नाचे वातावरण आहे. लंबोदर, गणपती, विनायक, एकदंत, विघ्ननाशक आणि विनायक अशा विविध नावानी गणेशाला ओळखले जाते. देशात गणेशाची अनेक मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची आपली अशी एक वेगळी पौराणिक कथा आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात असे एक मंदिर आहे जिथे जिथे भगवान विष्णूंचे 10 वे अवतार मानल्या जाणाऱ्या ‘कल्कि’ अवतारात भगवान गणेशाची पूजा केली जाते. हे मंदिर देशातील फार प्रख्यात मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराबाबतच्या अनेक गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. चला तर याविषयीच आज सविस्तर जाणून घेऊयात.
कल्की गणेश मंदिराविषयीच्या अनेक रंजक गोष्टी प्रचलित आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, हे मंदिर मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील मदन महलच्या रतन नगरमध्ये कल्की मंदिर वसलेले आहे. कल्की गणेश मंदिराला ‘सुप्तेश्वर गणेश मंदिर’ या नावानेही ओळखले जाते. हे मंदिर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे 311 किमी आणि विदिशापासून सुमारे 261 किमी अंतरावर आहे.
हेदेखील वाचा – दुसऱ्या शहरात कुणाचा मृत्यू झाला तर मृतदेह रेल्वेने नेता येईल का? काय नियम आहेत? जाणून घ्या
कल्की मंदिराशी संबंधित एकाच नाही तर अनेक रंजक गोष्टी जोडलेल्या आहेत. हे देशातील एकमेव असे मंदिर मानले जाते, जेथे कल्कीच्या रूपात गणेशाची पूजा केली जाते. येथे भगवान गणेशाची 25 फूट विशाल खडकात विराजमान आहेत. हा महाकाय खडक सुमारे 100 चौरस फूट परिसरात आहे. येथील मंदिर परिसरात दिवे लावण्याची पद्धत आहे.
हेदेखील वाचा – झारखंडची ती नदी जिथे हिरे सापडतात! पाण्यात दडवलेल्या खजिन्याचे रहस्य जाणून घ्या
कल्की गणेश मंदिर हे देशातील पवित्र मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराविषयी असे म्हटले जाते की, जो व्यक्ती सिंदूर लावून खडकाची प्रदक्षिणा घालतो, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. या मंदिराविषयी आणखीन एक आख्यायिका अशी आहे की, जो भक्त 41 दिवस मंदिराजवळ दिवा लावून पूजा करतो, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. यामुळेच येथे अनेक भाविक दिवा लावण्यासाठी येत असतात.
या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे, गणेश चतुर्थीच्या दिवशी इथे भाविकांची फार गर्दी दिसून येते. गणेश उत्सवानिमित्त या मंदिराला दिव्यांनी आणि फुलांनी सजवले जाते. या प्रसंगी इथे प्रचंड जल्लोष पाहायला मिळतो. इथे खाद्यपदार्थांचे स्टॉलदेखील लावण्यात येते.