बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातील हिंसक निषेधानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोमवारी संध्याकाळी जेव्हा जमाव पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसला तेव्हा हसिना हेलिकॉप्टरमधून देश सोडून पळून गेल्या. यावेळी आंदोलक पंतप्रधानांच्या राजीनाम्याचा आनंद साजरा करताना दिसले, तर बांगलादेश लष्कराने हे सुनिश्चित केले की अंतरिम सरकार लवकरच आपला कार्यभार स्वीकारेल. बांगलादेशात सत्तापालट होण्यापूर्वीही अनेक देशांमध्ये सत्तापालट झाले होते. चला तर मग याविषयीच आज सविस्तर जाणून घेऊयात.
बांगलादेशातील सत्तापालटाची सुरुवात गेल्या महिन्यातील काही विरोध प्रदर्शनांतून सुरु झाली. जेव्हा बांगलादेश उच्च न्यायालयाने स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के कोटा बहाल करण्याच्या बाजूने निर्णय दिला. नोकरीतील आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी आणि पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे आंदोलक आणि समर्थक यांच्यात उसळलेल्या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे की संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता देशभरात लष्कर तैनात करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – सदृढ आरोग्यासाठी घरी बनवा ‘ओट्सचा लाडू’! चवीबरोबरच पोषणही मिळेल, त्वरित रेसिपी नोट करा
अफगाणिस्तानमध्येही 2021 मध्ये सत्तापालट झाली होती. जेव्हा देश तालिबानच्या ताब्यात आला आणि माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनाही देश सोडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये पळून जावे लागले. तालिबानने दोन दशके अमेरिकेशी लढल्यानंतर अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलमधील राष्ट्रपती भवनात ध्वज फडकावला.
बांगलादेशप्रमाणेच 2022 मध्ये, श्रीलंकेत काही निदर्शने मार्च महिन्यात सरकारच्या विरोधात सुरू झाली. जेव्हा श्रीलंकेच्या सरकारने देश दिवाळखोर झाल्याचे जाहीर केले तेव्हा हजारो श्रीलंकन नागरिक रस्त्यावर उतरले. कोलंबोमध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या इमारतीला आंदोलकांनी घेराव घातला आणि गोटाबाया त्यांच्या गावी जा अशा घोषणांची मागणी नागरिक करू लागले . आंदोलक त्यांच्या खोल्यांमध्ये विश्रांती घेत असताना आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाचे अनेक व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
1958 मध्ये जनरल अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात पहिला लष्करी उठाव झाला. त्यावेळचे पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांनी पाकिस्तानची राज्यघटना रद्द केली आणि मार्शल लॉ घोषित केला, जो 27 ऑक्टोबरपर्यंत कायम चालू राहिला.
भारताच्या लोकशाही संस्था इतक्या मजबूत आहेत की लष्कराला भारतात सत्तापालट करणे पूर्णपणे अशक्य आहे. याला अगदी नैसर्गिक कारणेदेखील आहेत. भारतीय लष्कराची स्थापना ब्रिटीशांनी केली होती आणि त्याची रचना पाश्चात्य देशांच्या धर्तीवर करण्यात आली होती. यासोबतच भारत सरकार खूप मजबूत आहे, त्यामुळे सत्तापालट सारखी परिस्थिती भारतावर याने फार कठीण आणि अशक्य आहे.