फोटो सौजन्य: iStock
राजस्थान हे भारतातील अशा शहरांपैकी एक आहे जिथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. देश-विदेशातून लाखो पर्यटक राजस्थानला भेट देतात. या राज्याची संस्कृती, कलाकृती, जीवनशैली आणि प्रसिद्ध पाककृती सर्वांना आकर्षित करतात. तुम्ही देखील राजस्थानला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. IRCTC (भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन) ने या राज्याच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी एक अद्वितीय टूर पॅकेज आणले आहे. हे पॅकेज विशाखापट्टणम आणि त्याच्या आसपासच्या भागातील लोकांना 9 रात्री आणि 10 दिवसांसाठी राजस्थानची सैर करण्याची संधी देते.
चला तर मग या पॅकेजची सर्व माहिती जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला देखील राजस्थानचा आनंद घेता येईल तेही कमी बजेटमध्ये
कमी बजेटमध्ये देता येणार ‘या’ शहरांना भेट
IRCTC च्या या पॅकेजद्वारे तुम्ही जयपूर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, माउंट अबू, पुष्कर आणि अजमेर या आठ प्रसिद्ध शहरांना भेट देऊ शकतात. टूरमध्ये चौकी धानी, हवा महल, देशनोक मंदिर, जुनागड किल्ला, आणि दर्गा शरीफ यांसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे. हे पॅकेज 17 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे आणि विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासाला सुरुवात होईल.
पॅकेजच्या किमती
टूर पॅकेजची किंमत विविध श्रेण्यांमध्ये उपलब्ध आहे. सिंगल ऑक्युपन्सीसाठी रु. 68,800, डबल ऑक्युपन्सीसाठी रु. 51,490, ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी रु. 48,630, बेड विथ चाइल्ड (11 वर्ष) रु. 40,290, आणि बेड नसलेल्या मुलासाठी (5-11 वर्षे) रु. 37,30 इतका खर्च आहे. या पॅकेजमध्ये प्रवास खर्च, हॉटेलचा खर्च आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. यात 3 तारांकित आणि 4 तारांकित हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, नाश्ता आणि रात्रीचे जेवण देखील दिले जाते.
तिकीट बुकुंग कुठे करता येणार
तिकीट बुकिंग किंवा पॅकेजशी संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी, IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourismindia.com ला तु्म्ही भेट देऊ शकता. मात्र तुम्हाला जर अचानक ट्रीप रद्द करावी लागल्यास यासाठी प्रवाशांनी प्रवासाच्या 21 दिवस आधी बुकिंग रद्द केल्यास पॅकेजच्या 30% शुल्क भरावे लागेल. 21 ते 15 दिवस आधी रद्द केल्यास 55% शुल्क भरावे लागेल. तर 14 ते 8 दिवस आधी रद्द केल्यास 80% शुल्क आणि 8 दिवसांपेक्षा कमी कालावधीत रद्द केल्यास कोणतेही पैसे परत केले जाणार नाहीत.
IRCTC चे रॉयल राजस्थान टूर पॅकेज प्रवाशांना राजस्थानचे वैभव अनुभवण्याची एक उत्तम संधी देते, ज्यात आरामदायक प्रवास, निवास आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला जाऊ शकतो.