Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील 'ही' 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Travel News : आजच्या डिजिटल युगात काम करण्याच्या पद्धतीत प्रचंड बदल झाला आहे. ऑफिसच्या चार भिंतींमध्ये बसून काम करण्याचा काळ हळूहळू मागे पडत चालला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’नंतर आता ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’चा ट्रेंड वेगाने वाढतो आहे. विशेषत: तरुण पिढी आणि डिजिटल भटके (Digital Nomads) शांत, नैसर्गिक आणि वायफाय-सुसज्ज ठिकाणी जाऊन काम करण्याला प्राधान्य देत आहेत. कामासोबतच निसर्गाचा आनंद, शांती आणि नवी ऊर्जा मिळावी, या हेतूने भारतातील अनेक ऑफबीट ठिकाणे आता रिमोट वर्कसाठी लोकप्रिय होत आहेत. भारताच्या उत्तर ते दक्षिणेकडील काही सुंदर ठिकाणे अशा प्रकारे ‘वर्केशन डेस्टिनेशन’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशी सहा खास ठिकाणे, जी काम आणि आराम यांचा परिपूर्ण समतोल साधतात.
हिमालयाच्या कुशीत वसलेले जुनी मनाली हे डिजिटल भटक्यांसाठी स्वर्ग मानले जाते. नदीकाठी असलेली जुनी लाकडी घरे, शांत कॅफे आणि अरुंद रस्ते येथे मनाला समाधान देतात. शांत वातावरणात लक्ष केंद्रित करून काम करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. काम झाल्यावर तुम्ही स्थानिक बाजारपेठा, ट्रेकिंग पॉइंट्स किंवा निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.
हे देखील वाचा : World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
पॅराग्लायडिंगसाठी जगप्रसिद्ध बीड हे आता ‘वर्क फ्रॉम हिल्स’चे नवे केंद्र बनत आहे. येथील थंड हवा, पर्वतरांगांनी वेढलेले निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर कॅफे डिजिटल नोमॅड्सना आकर्षित करतात. दिवसभर काम करून संध्याकाळी सूर्यास्ताचा आनंद घेणे हीच खरी विश्रांती ठरते.
योग आणि अध्यात्माचे केंद्र असलेले ऋषिकेश हे गंगेच्या पवित्र काठावर वसलेले आहे. येथे कामासोबतच मनालाही शांती मिळते. नदीकिनारी असलेले कॅफे, योग केंद्रे आणि पर्वतरांगा हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. इथे काही काळ राहून रिमोट वर्क करताना तुम्हाला ताजेतवानेपणा आणि मानसिक शांती दोन्ही अनुभवता येतात.
भारताचे ‘स्कॉटलंड’ म्हणून ओळखले जाणारे कूर्ग हे कॉफीच्या बागांसाठी आणि हिरवळीने नटलेल्या टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मंद गतीचे, शांत वातावरण तुम्हाला केवळ कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करत नाही, तर एक वेगळाच निसर्गानुभव देऊन जाते. थंड वार्यात आणि कॉफीच्या सुगंधात काम करण्याचा अनुभव खरोखर अनोखा असतो.
जर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत लॅपटॉपवर काम करायचे असेल, तर वर्गला हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारे, सी-व्ह्यू कॅफे आणि निवांत वातावरण हे कामालाही सुट्टीसारखे बनवतात. दिवसभर काम केल्यानंतर समुद्रकिनारी बसून ताजेतवाने होणे म्हणजे खरं ‘वर्क-लाइफ बॅलन्स’.
हे देखील वाचा : सरड्यांच्या जगातील गुपित कथा! तुम्हाला माहित नसतील ‘अशा’ 5 अद्भुत गोष्टी
पुद्दुचेरीजवळचे ऑरोव्हिल हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर एक जीवनशैली आहे. सामुदायिक जीवन, आंतरिक शांती आणि अध्यात्मिक वातावरण यामुळे हे ठिकाण वेगळे ठरते. शांततेत काम करायचे असेल आणि त्याचवेळी काही नवीन विचारांना आकार द्यायचा असेल, तर ऑरोव्हिल सर्वोत्तम आहे.