(फोटो सौजन्य: Pinterest)
जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना फिरण्याची आणि नवनवीन ठिकाणे एक्सलपोर करण्याची फार आवड असते. प्रत्येक ठिकाण हे आपल्या सौंदर्यासाठी किंवा तेथील जुन्या इतिहासासाठी लोकप्रिय असते. लोक वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तिथला भौगोलिक इतिहास, सौंदर्य, शांततामय वातावरण अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेतात. मात्र आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत जे देशभरात एक धोकादायक ठिकाण म्हणून ओळखले जाते. इथे जाण्यास आधीच लोकांना मनाई केली जाते. असे नक्की या ठिकाणी काय आहे? चला जाणून घेऊया.
तुम्हाला देशभर आणि जगभर फिरण्याची आवड असेल, तर तुम्ही कधी ना कधी समुद्रकिनाऱ्यांवर सुट्टी घालवली असेल. समुद्रकिनाऱ्याचा विचार मनात आला की मनात स्वच्छ पाणी, सुंदर लाटा, उबदार वाळू आणि सूर्यप्रकाश यांचे सुंदर चित्र तयार होते. आम्ही तुम्हाला सांगतो, भारतात असे अनेक समुद्रकिनारे आहेत, जिथे देशभरातून आणि जगभरातून लोक सुट्टीसाठी येतात. अशातच, जगात असाही एक समुद्रकिनारा आहे जिथे आजही लोक रात्री जायला घाबरतात. आम्ही तुम्हाला सांगतो, या बीचवर दररोज पर्यटकांची मोठी गर्दी होते, परंतु अंधार पडू लागताच पर्यटक हे ठिकाण सोडून जातात. असे म्हटले जात आहे की, ज्या लोकांनी समुद्रकिनाऱ्यावर रात्रभर राहण्याचा प्रयत्न केला आहे ते एकतर परत आले नाहीत किंवा त्यांना सर्वात वाईट अनुभव आले. हे बीच नक्की कुठे आहे ते जाणून घेऊया.
गुजरातमध्ये वसले आहे हे बीच
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला डुमास बीच गुजरातमधील सर्वात भीतीदायक ठिकाणांपैकी एक मानला जातो. हा समुद्रकिनारा दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, एक काळ्या वाळूसाठी आणि दुसरा भारतातील सर्वात भयानक समुद्रकिनारा. असे म्हटले जाते की डुमास बीच हा एकेकाळी स्मशानभूमी म्हणून वापरला जात होता आणि त्यामुळेच इथे अनेक भुतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते.
काळ्या मातीसंबंधित अनेक कथा आहेत प्रचलित
डुमास बीचची वाळू काळी आहे, त्यामुळे या बीचच्या काळ्या वाळूबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, काळ्या वाळूचे अस्तित्व मृतांना जाळण्यापासून निर्माण झालेल्या राखेमुळे आहे जी समुद्रकिनाऱ्याच्या पांढऱ्या वाळूमध्ये मिसळून काळी झाली आहे. मात्र या गोष्टीचा आजवर कोणता ठोस पुरावा देण्यात आला नाही.
या 5 ठिकाणी होतो दैवी शक्तींचा आभास; गजबजाटापासून दूर इथल्या शांततेत घालवता येतील सुंदर क्षण
या समुद्रकिनाऱ्यावर अनेक नकारात्मक गोष्टी घडून आल्या ज्यामुळे याला भीतीदायक ठिकाण म्हणून नाव पडलं. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सुरतमधील डुमास समुद्रकिनाऱ्यावरून अनेक पर्यटक आणि स्थानिक लोक बेपत्ता झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथल्या बीचवर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला होता. लोकांनी असाही दावा केला आहे की, त्यांनी या समुद्रकिनाऱ्यावर विचित्र आवाज ऐकले आहेत. इथे मध्यरात्रीपासून रडण्याचे आणि हसण्याचे आवाज येतात. इथे अनेक आत्म्याचे वास्तव असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळेच इथे रात्री साधा कुत्राही फिरकत नाही.
तुम्हालाही या बीचच्या साहसाचा अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही इथे सहज पोहचू शकता. डुमास बीचवर पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. हा बीच सुरत शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे आणि येथे पोहोचण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो. शहरापासून डुमास बीचपर्यंत भरपूर सार्वजनिक वाहतूकह सेवाही उपलब्ध आहेत.