कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची?
संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहील आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. जर त्या गावात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची? हा सवाल संतोष देशमुख यांच्या भावाने उपस्थित केला होता. सरकारी वकील आणि या केस मध्ये काम पाहणारे उज्वल निकम यांनी पण या परवानगीला विरोध केला होता. मात्र कोर्टाने सगळ्या परिस्थितीचा विचार करून त्याला विशेष परवानगी दिली आहे. मात्र उज्ज्वल निकम यांनी म्हटल की ही केस फक्त एका राज्याची केस आहे. या प्रकरणात पोलीस बंदोबस्तची जबाबदारी हे प्रशासनाने घ्यावी अस त्यांनी म्हटल कोर्टाने या मध्ये ऑर्डर द्यावी हे न्यायालयात मांडल आहे. त्याला आता कोर्टाने परवानगी तर दिली आहे मात्र त्याला सकाळी ९ ते ४ पर्यंत त्याच्या घरी थांबता येणार आहे. एवढ्या वेळेसाठी परवानगी त्याला देण्यात आली आहे.
पोलीस बंदोबस्त मिळणार मात्र शुल्क चाटेला भराव लागणार
जयराम चाटे याला १४ महिन्यानंतर जेल बाहेर एक दिवस परवानगी मिळाली आहे. मात्र त्याला त्या दिवशी जो पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे. त्याचे शुल्क मात्र त्याला भराव लागणार आहे. त्याचे शुल्क भरून त्याला सोडण्यात येणार आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी हा वाल्मीक कराड याने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज हा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल आहे. वाल्मिक कराड हा सातत्याने जामीन अर्ज करत आहे. मात्र कोर्टाने हे सगळ फेटाळून लावलं आहे. आता जयराम चाटे याला १४ महिन्यानंतर भावाच्या धार्मिक विधीसाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे.
Ans: त्याच्या धाकट्या भावाच्या बाराव्या धार्मिक विधीसाठी न्यायालयाने विशेष परवानगी दिली.
Ans: न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत तो बाहेर राहू शकतो.
Ans: जयराम चाटेला पोलिस बंदोबस्तात घरी जाता येणार असून त्या बंदोबस्ताचे शुल्क त्यालाच भरावे लागणार आहे.






