आषाढी एकादशीच्या निमित्ताने उल्हासनगर कॅम्प ५ मधील विठ्ठल मंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दिंडी यात्रा निघाली आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषात वारकरी पोशाखातील महिला, पुरुष तसेच लहान मुलांनी दिंडीत सहभाग घेतला. उल्हासनगर शहरात जेवण डबे वाहतूक करणाऱ्या या बांधवांनी पंढरपूरला प्रत्यक्ष न जाता, ‘उल्हासनगरच आमची कर्मभूमी आणि पंढरी’ या भावनेने वारीचा आनंदोत्सव उल्हासनगरात अनुभवण्यासाठी काही वर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे.