संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दिर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत जलसंपदा विभागाने बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला आहे. या माध्यमातून साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार आहे. या बैठकीला आमदार अमोल खताळ, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.