बीडच्या पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी युपीएससी आणि एमपीएससीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. नायगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भाजपा आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी यूपीएससी मधून उत्तीर्ण झालेले पंकज आवटे, सुशील गीते, अक्षय मुंडे, आणि एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बिबीशन बेद्रे,राजेश निर्मळ, कोमल भोंडवे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे संपन्न झाला यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी बोलताना म्हटले की याचा मला मनस्वी आनंद आहे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याचा मोठा वाटा आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्याची मान उंचावल्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे देखील भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे या कार्यक्रमाचे आयोजन नायगावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक सुपेकर यांनी केले होते यावेळी या गुणगौरव सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.