जिल्ह्यातील नसरापूर येथे अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कोवळ्या वयात असलेल्या चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून क्रूर अंत झाल्याची ही घटना आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून, नराधमाच्या विकृतीचा बळी ठरलेल्या त्या निष्पाप बाळासाठी आज संपूर्ण गाव अश्रू ढाळत आहे.मिळालेली माहिती काळजाचा थरकाप उडवणारी आहे. ही छोटी मुलगी आपल्या आजीकडे सुट्ट्या घालवण्यासाठी मोठ्या आनंदाने आली होती. घरासमोर खेळत असताना, एका ६५ वर्षीय नराधमाने तिला गाठले. नात्याची आणि वयाची कोणतीही मर्यादा न राखता त्या नराधमाने तिला जवळच असलेल्या एका गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर हे पाप लपवण्यासाठी त्याने त्या चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकला.दुपारपासून लाडकी लेक दिसत नाही म्हणून व्याकूळ झालेल्या पालकांनी शोधाशोध सुरू केली आणि शेवटी विदारक सत्य समोर आले.