गुजरातमध्ये बस अपघत (फोटो- istockphoto)
गुजरात राज्यात भीषण बस दुर्घटना
जुनागडमध्ये भाविकांची बस उलटली
15 पेक्षा जास्त नागरीक जखमी
Junagadh Bus Accident: गुजरात राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरातमध्ये बसचा भीषण अपघात घडला आहे. जुनागढमध्ये प्रवासी भीषण अपघात झाला आहे.गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात भाविकांच्या एका खासगी बसला भीषण अपघात झाला. जुनागढ जिल्ह्यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत 2 महिला भविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 15 नागरिक जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, खासगी बस 40 भाविकांना घेऊन द्वारका येथून सोमनाथच्या दिशेने जात होती. सर्व भाविक भावनगर जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. हायवेवरुन जात असताना बससमोर अचानक एक नीलगाय आली. या नीलगायीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या चालकाने बस जोरात वळवली ज्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उलटली.
अपघात झाल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी तातडीने प्रशासन दाखल झाले. अपघातानंतर प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. १०८ रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेन आणि स्थानिक लोकांची मदत घेण्यात आली.
बातमी अपडेट होत आहे…






