प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडु यांनी शिवसेनेत प्रवेश आणि एमएलसी अर्जाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना हा निर्णय परिस्थितीमुळे घ्यावा लागल्याचे सांगितले.“ही परिस्थितीची गरज होती, केवळ सोय नव्हती,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत “आम्ही काही मुंबई-दिल्लीवाल्यांचे गुलाम नाही,” असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. ज्यांना आपण पुढे आणले, त्यांनीच गुलाम बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचा झेंडा आणि धनुष्यबाण यांचा सन्मानपूर्वक स्वीकार करत ही शिवसेना सर्वांची असून सर्वांना सोबत घेऊन चालणारी असल्याचे त्यांनी सांगितले. कष्टकरी वर्गाला ही शिवसेना आपली वाटावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अचलपूर विधानसभा मतदारसंघ हा आपला हक्काचा असल्याचे सांगत पुढील निवडणुकीत तेथूनच लढण्याचे संकेत दिले. जात, धर्म, पंथ आणि पैशाच्या आधारावर चालणाऱ्या राजकारणाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त करत सर्व थोर पुरुषांच्या विचारांचा सन्मान राखत पुढे जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. .