ठाणे गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे ४ कोटींचा एमडी पावडर जप्त करत तिघांना अटक केली आहे. यामध्ये एका झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयसह मध्यप्रदेशातून आलेल्या तरुणाचाही समावेश आहे. पहिल्या कारवाईत पनवेलच्या इरफान शेखकडून १.५२ किलो एमडी पावडर जप्त करण्यात आली असून, त्याची बाजारातील किंमत ३ कोटींपेक्षा अधिक आहे. दुसऱ्या कारवाईत भिवंडीमार्गे येणाऱ्या शाहरूख मेवासीकडून ६६२ ग्रॅम एमडी सापडली. दोघांवर अनुक्रमे शीळ डायघर आणि कळवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.