Shirdi :श्री साईबाबा संस्थान (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०६ वा श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव करण्यात आला. आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्या फोटो व पोथीच्या मिरवणूकीने सुरुवात झाली. मुंबई येथील मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिर परीसरात करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतलं.संस्थान समिती सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी ,. उप मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूकीनंतर श्रींची शेजारती होईल. तर अखंड पारायणासाठी श्री व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे.