कल्याण पूर्व आणि परिसरात महावितरणाकडून सतत वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे आजाराने ग्रस्त आहेत, त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कल्याण पूर्वेत सुरळीत वीजपुरवठा चालू रहायला पाहिजे, या उद्देशाने महेश गायकवाड यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांना चक्क कंदील भेट दिला आहे. इतर शहारांना फायदा मिळवून देण्यासाठी कल्याण पूर्वेतील वीज पुरवठा खंडित केला जातो. असं गायकवाड यांनी सांगितलं आहे. जर कल्याण पुर्वेत सुरळीत वीजपुरवठा दिला नाही तर आम्ही मोर्चा घेऊन येऊ असा इशारा कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड यांनी दिला आहे.