अंबरनाथ तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालून बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आंदोलन केले. नुकतेच बदलापुरातील एका शाळेत सातवीच्या विद्यार्थीनी सोबत शिक्षकाने गैरकृत्य केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या शाळेला केवळ पहिली पर्यंत परवानगी असून दहावी पर्यंत परवानगी नसल्याची बाब समोर आली. याप्रकरणी गट शिक्षण अधिकारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आंदोलन केले. यावेळी गट शिक्षण अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालून निषेध व्यक्त केला. तसेच शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी देशमुख यांनी केली. तर देशमुख यांचे सर्व आरोप गटशिक्षण अधिकारी जतकर यांनी फेटाळले आहेत.