कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुण विलास म्हात्रेच्या मृत्यूनंतर मनसेने केडीएमसी मुख्यालयात नारळ फोडून जोरदार निषेध आंदोलन केले. “ईडा पिडा टळू दे, नागरीकांचे आरोग्य सुधारू दे” अशा घोषणा देत नागरिकांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. विलास म्हात्रे घरातील एकमेव कमावता होता, त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महापालिकेला ५० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.