कोल्हापूर ही कलानगरी आहे.. त्यामुळे कोल्हापूर चित्रनगरी इथं जगाशी तुलना करणारे आधुनिक तंत्रज्ञान उभारणार असून येत्या काळात पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. याशिवाय मराठी सिनेमासाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची देखील या ठिकाणी स्थापना करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरातील चित्रनगरी इथं 44 कोटींच्या विविध चित्रीकरण स्थळांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं..या प्रसंगी आशिष शेलार बोलत होते.यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक यांच्या सह मान्यवर , कलाकार उपस्थित होते.