सौजन्य - नवराष्ट्र टीम
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय भेगडे, माजी आमदार रुपलेखा ढोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नगरपरिषदेची जुनी इमारत ५० वर्षांपूर्वीची असल्याने वाढत्या नागरिकीकरणामुळे नवीन इमारतीची आवश्यकता निर्माण झाली होती. सन २०२२ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात आले. यासाठी एकूण अपेक्षित खर्च सुमारे ४० कोटी रुपये आहे. यामध्ये सिव्हील वर्कसाठी २७ कोटी, फर्निचरसाठी ८ कोटी, इलेक्ट्रिशियन कामासाठी ५ कोटी इतका खर्च होणार असल्याचे बांधकाम विभागाचे राम सरगर यांनी सांगितले. नूतन इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअरसह चार मजले आहेत. प्रत्येक मजल्यावरील प्रशासकीय कामकाजाचे नियोजन पुढील प्रमाणे केले गेले आहे.
अशा असणार सोयीसुविधा